Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : हिंदू की मुस्लिम कोणत्या पद्धतीने लग्न करणार सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल? वाचा सविस्तर...
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल दोघं लवकरच सात जन्माच्या गाठी बांधणार आहेत. हे दोघं हिंदू की मुस्लिम कोणत्या पद्धतीने लग्न करणार आहेत, हे जाणून घ्या.
![Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : हिंदू की मुस्लिम कोणत्या पद्धतीने लग्न करणार सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल? वाचा सविस्तर... sonakshi sinha marriage and zaheer iqbal wedding both will marry according to special marriage act 1954 know details Here in marathi news Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : हिंदू की मुस्लिम कोणत्या पद्धतीने लग्न करणार सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल? वाचा सविस्तर...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/70575febcf5dd46d016fbc04657461f81719069617994322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दोघांची लग्नसराई मोठ्या उत्साहात सुरु आहे. सोनाक्षीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटोही समोर आले आहेत. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनाक्षीच्या लग्नासाठी शत्रुघ्न सिन्हा यांचा मुंबईतील जुहू येथील ‘रामायण’ बंगला फुलांनी सजवण्यात आला असून आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे.
सोनाक्षी आणि जहीर कोणत्या पद्धतीने लग्न करणार?
अवघ्या काही तासांत सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल लग्नगाठ बांधणार आहेत. दोघे कलाकार 23 जूनला लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाची चाहत्यांना खूप उत्कंठा लागली आहे. सोनाक्षी सिन्हा हिंदू आहे, तर झहीर इक्बाल मुस्लिम आहे. अशा परिस्थितीत दोघांचं लग्न कोणत्या रितीरिवाजांनुसार होणार आहे, हे सर्वांना जाणून घ्यायचं आहे. एबीपी न्यूजला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षी सिन्हा आणि झहीरचा विवाह हिंदू किंवा मुस्लिम धर्मानुसार होणार नाही. मग जाणून घ्या दोघांचं लग्न कसं होणार आहे.
हिंदू की मुस्लिम कोणते विधी पाळले जाणार?
सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाची बातमी समोर आल्यापासून त्यावर बरीच चर्चा रंगली आहे. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे या लग्नाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. सोनाक्षी सिन्हा लग्नानंतरही धर्म बदलणार नाही, अशी मोठी माहिती सूत्रांनी सांगितलं आहे. झहीरशी लग्न करूनही सोनाक्षी हिंदूच राहणार आहे.
लग्न कोणत्या धर्मानुसार होणार?
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षी आणि जहीरचं लग्न मुस्लिम रितीरिवाजांनुसार किंवा हिंदू धर्मानुसार होणार नाही. या दोघांचं लग्न 1954 च्या विशेष विवाह कायद्यानुसार नोंदणीकृत पद्धतीने होणार आहे. याचा दोन्ही धर्माशी काही संबंध नाही. त्यामुळे या लग्नात हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्मातील कोणत्याही प्रथा पाळल्या जाणार नाहीत.
शत्रुघ्न सिन्हांची नाराजी दूर
काही दिवसांपूर्वी अशी अफवा पसरली होती की, सोनाक्षीचे कुटुंब तिच्या लग्नावर खूश नसून लग्नाला उपस्थित राहणार नाही. यादरम्यान, शत्रुघ्न सिन्हा नुकतेच झहीर इक्बालच्या घरी दिसले. या अफवांना पूर्णविराम देत शत्रूघ्न सिन्हा यांनी मीडियाला माहितीही दिली की, सोनाक्षी आणि जहीर यांची 23 जूनला रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : मतभेद मिटले 'रामायणा' सजलं, सोनाक्षीच्या हातावर रंगली झहीर इक्बालच्याच नावाची मेहंदी; दोन्ही कुटुंबानी एकत्र येऊन साजरा केला आनंद
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)