Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हानं मुंबईमध्ये घेतलं आलिशान घर; किंमत वाचून डोळे विस्फारतील
Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाच्या या नव्या आलिशान घराची किंमत किती आहे? याबाबात जाणून घेऊयात...
Sonakshi Sinha: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसेच चित्रपटांमुळे चर्चेत असते. सध्या सोनाक्षी ही तिच्या मुंबईतील (Mumbai) नव्या घरामुळे चर्चेत आहे. सोनाक्षीनं मुंबईमध्ये एक आलिशान सी फेसिंग घर खरेदी केले आहे. सोनाक्षी सिन्हाच्या या नव्या आलिशान घराची किंमत किती आहे? याबाबात जाणून घेऊयात...
सोनाक्षी सिन्हाने वांद्रे येथील रंग शारदा सभागृहाजवळ 81 ओरेटमध्ये 4,200 चौरस फुटांचे सीफेसिंग घर विकत घेतले आहे. तिच्या या घराची डिल 11 कोटी रुपयांना झाली आहे. हे घर केसी रोड, वांद्रे येथील इमारतीच्या 26व्या मजल्यावर म्हणजेच टॉप फ्लॉरवर आहे. रिपोर्टनुसार, या घरासाठी सोनाक्षीनं 55 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.
सोनाक्षीच्या या नवीन घराचा लॉबी एरिया 348.43 स्क्वेअर फूट आहे. हेल्पर टॉयलेट आणि एअर हँडलिंग युनिटसाठीही या घरात जागा आहे. घराचा एकूण कार्पेट एरिया 4,210.87 चौरस फूट आहे. तसेच चार कार पार्किंगची जागा देखील या घरासोबत सोनाक्षीला मिळणार आहे. माहीम खाडी आणि वांद्रे-वरळी सी लिंकचे सुंदर दृश्य देखील सोनाक्षीच्या या घरामधून दिसते.
View this post on Instagram
सोनाक्षी सिन्हाचे चित्रपट
सोनाक्षी सिन्हा ही बडे मियाँ-छोटे मियाँ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिचा डबल एक्सएल हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. तसेच तिची दहाड ही वेब सीरिज देखील काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या वेब सीरिजमधील सोनाक्षीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
2010 मध्ये रिलीज झालेल्या दबंग या चित्रपटामधून सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिनं राउडी राठोड, जोकर आणि लूटेरा या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. सोनाक्षी ही तिच्या अभिनयानं आणि स्टाईलिश अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
सोनाक्षीचं नाव गेल्या काही दिवसांपासून अभिनेता झहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) जोडलं जात आहे.सोनाक्षी आणि झहीर हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात पण या दोघांनी त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Dahaad Review : प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी सोनाक्षी सिन्हाची 'दहाड'