एक्स्प्लोर

Sohail Khan-Seema Khan Divorce : बॉलिवूडप्रमाणे आमच्या आयुष्यातही ड्रामा आणि मसाला..., सोहेल खानची सीमा खानसाठीची 'ती' शेवटची पोस्ट व्हायरल

Sohail Khan-Seema Khan : सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खान आणि सीमा खान यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे.

Sohail Khan-Seema Khan Divorce : बॉलिवूड अभिनेता सोहेल खान (Sohail Khan) आणि सीमा खान (Seema Khan) यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे, असे म्हटले जात आहे. सोहेल आणि सीमा यांच्या लग्नाला 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. 'द फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलीवूड वाइव्ह' या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी वेगळं राहत असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. पण तरीही अनेकदा ते एकमेकांना समर्पित पोस्ट शेअर करत असतात. 

सोहेल आणि सीमा दोघांनीही 2020 मध्ये एकमेकांसाठीची शेवटची पोस्ट लिहिली आहे. सोहेलने सीमाच्या 'द फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलीवूड वाइव्ह' या कार्यक्रमाची शेवटची पोस्ट शेअर करत तिला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्याने नेटफ्लिक्सच्या एका सीरिजचा ट्रेलरदेखील शेअर केला होता. त्याने लिहिले होते, बॉलिवूडप्रमाणे आमच्या आयुष्यातही ड्रामा आणि मसाला आहे."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sohail Khan (@sohailkhanofficial)

सोहेल आणि सीमा 1998 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना निर्वाण आणि योहन ही दोन मुले आहेत. पण 2017 पासून दोघे वेगळे राहतात, असे म्हटले जाते. अद्याप सोहेल आणि सीमा यांनी घटस्फोटासंदर्भात कोणतेही अधिकृत घोषणा केलेली नाही. सोहेलच्या भावाचा म्हणजेच अरबाज खानचादेखील याआधी घटस्फोट झाला आहे. 

नुकताच सोहेल आणि सीमाचा फॅमिली कोर्टाच्याबाहेरील फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे लवकरच ते विभक्त होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या घटस्फोटामुळे त्यांचे चाहते मात्र नाराज होणार आहेत. 'द फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलीवूड वाइव्ह' या शोमध्ये असं दाखवण्यात आलं होतं की, सोहेल आणि सीमा दोघे वेगवेगळे राहतात आणि त्यांची मुलं त्यांच्यासोबत राहतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sohail Khan (@sohailkhanofficial)

सीमा एक फॅशन डिझाइनर असून  'बांद्रा 190' नावाचे तिचे फॅशन स्टोर आहे. तसेच सोहेलनं अनेक सिनेमांत काम केलं आहे. ट्यूबलाइट, जय हो, राधे, वीर, प्यार किया तो डरना क्या,  आणि हॅलो या सिनेमांत सोहेल मुख्य भूमिकेत होता. सोहेल, अरबाज आणि सलमान हे तिघेही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. 'मैंने दिल तुझको दिया' या सिनेमाच्या माध्यमातून सोहेलने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

संबंधित बातम्या

Sohail Khan Seema Khan Divorce : मलायका-अरबाजनंतर आता सोहेल आणि सीमा घेणार घटस्फोट; फॅमिली कोर्टाबाहेरील फोटो व्हायरल

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'ने केला जागतिक विक्रम; भारतीय सांकेतिक भाषेत ओटीटीवर प्रदर्शित होणारा ठरला पहिला सिनेमा

Jayeshbhai Jordaar : जयेशभाई 'जोरदार' झालेच नाहीत; रणवीर सिंहचा चित्रपट पाहून प्रेक्षक म्हणाले, 'बोरिंग...'

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget