Singham Again Trailer: सीतेचं अपहरण, लंका दहन ते कलियुगातील रावणाचा वध; बॉलिवुडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्रेलर रिलीज
Singham Again Trailer: अजय देवगणच्या सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे..
Singham Again Trailer: सीतेचं अपहरण, रावणाचा पराभव, रामाचा विजय असा सगळा आशय घेऊन रामायणाचा टच असलेला सिंघम अगेनचा (Singham Again) ट्रेलर नुकतच रिलीज करण्यात आला आहे. अजय देवगनच्या (Ajay Devgan) सिंघनम अगेन या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असून या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. दिवाळीमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. दरम्यान अक्षय कुमारने सिंघम अगेनचा ट्रेलर रिलीज केला. अक्षयने हा ट्रेलर रिलीज करताना अक्षयने म्हटलं की, कोण येणार आहे हे फक्त पब्लिकलाच माहीत आहे! ही दिवाळी तुमच्या वीरांसोबत साजरी करा!
रामायणाच्या गोष्टीचा आशय
सिंघम अगेनची गोष्टीमध्ये रामायणाचा आशय आहे. ट्रेलरवरुन असं समजतंय की, अजय देवगन आपल्या सीतेसाठी लंका दहन करायला गेला आहे. या अॅक्शन सिनेमात लेडी सिंघम म्हणजेच दीपिका पादुकोणचीही झलक पाहायला मिळतेय.
चार मिनिटं 58 सेकंदाचा ट्रेलर
सिंघम अगेनच्या ट्रेलरने इतिहास रचला आहे. हा ट्रेलर चार मिनिटे 58 सेकंदांचा आहे आणि यासोबतच हा आतापर्यंतचा हिंदी सिनेमाचा सर्वात मोठा ट्रेलर आहे. सिंघम अगेनमध्ये अजय देवगणसोबत करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. यावेळी चित्रपटातील खलनायक दुसरा कोणी नसून अर्जुन कपूर आहे.
सिंघम अगेन हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा चित्रपट आहे. हा सिनेमा त्याच्या सिंघम सीरिजमधीलच एक आहे. रोहित शेट्टीने 2011 मध्ये सिंघम सिनेमा दिग्दर्शित केला होता. त्यानंतर त्याने 2014 मध्ये सिंघम रिटर्न्सही आणला होता. तेव्हापासून सूर्यवंशी आणि सिम्बा देखील रोहित शेट्टीच्या या सीरिजमध्ये सामील झाले. या सर्व चित्रपटात सर्व प्रमुख कलाकार पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसले.
View this post on Instagram