Singer KK Death : केके यांचं पार्थिव मुंबईत आणलं, गुरुवारी अंत्यसंस्कार होणार
Krishnakumar Kunnath : उद्या केके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अख्ख बॉलिवूड येण्याची शक्यता आहे.

मुंबई: कोलकातामधील कॉन्सर्टनंतर हृदयविकाराचा झटका आल्यानंतर निधन झालेल्या गायक केके यांचं पार्थिव आज मुंबईत आणण्यात आलं. सध्या मुंबईतल्या वर्सोव्यातल्या राहत्या घरी केकेचं पार्थिव आणण्यात आलंय. उद्या मुंबईतल्या वर्सोवा इथल्या स्मशानभूमीत केकेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. केकेला अखेरचा निरोप देण्यासाठी उद्या अख्खं बॉलिवूड येण्याची शक्यता आहे.
अवघ्या तरुणाईला प्रेम व्यक्त करायला शिकवणारा आवाज, प्रेम भंग झालेल्यांना आधार देणारा आवाज अशी केके यांची ओळख होती. केके यांनी बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत. 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातील 'तडप तडप के इस दिल से' हे त्यांचं गाणं लोकप्रिय झालं होतं. 'खुदा जाने' सारखे रोमँटिक गाणे, 'इट्स द टाइम टू डिस्को' आणि 'कोई कहे कहता रहे' सारखे डान्स नंबर्स तसेच 'तडप तडप के इस दिल से' सारखी गाणी आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.
केके यांचा जन्म दिल्लीमध्ये जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी झाला होता. दिल्लीतील माउंट मेरी स्कूलमध्ये केके यांनी शिक्षण घेतलं. इयत्ता दुसरीत असताना त्यांनी आपले पहिले गाणं गायले. तसेच केके यांनी किरोडी मल कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ग्रॅज्युएशननंतर केके यांनी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीही केली आणि या दरम्यान त्यांनी 35 हजारांहून अधिक जिंगल्स गाण्यांचा रेकॉर्ड केला. 1999 मध्ये त्यांचा पल नावाचा त्यांचा पहिला अल्बम रिलीज केला.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी केके यांना बॉलिवूडमध्ये गाण्याची पहिली संधी दिली. 'माचीस' चित्रपटातील गाण्यांमधून गायक केके यांना विशेष लोकप्रियता मिळाली. माचीस चित्रपटामधील छोड आये हम... या चित्रपटातील गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल चुके सनम' या चित्रपटामधील तड़प तड़प के... या केके यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
नऊ भाषांमध्ये केली गाणी रेकॉर्ड
केके यांनी हिंदीसोबतच नऊ भाषांमधील गाणी रेकॉर्ड केली आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये केकेनं 200 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. फिल्मफेयर अवार्ड देऊन देखील केके यांनी गौरवण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
