(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दुआ लिपाच्या लईव्ह कॉन्सर्टमध्ये शाहरुखचा जलवा, चक्क किंग खानच्या गाण्यावर केलं परफॉर्म; प्रेक्षकही अचंबित!
मुंबईत गायिका दुआ लिपाचा एक लाईव्ह कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टमध्ये तिने थेट शाहरुख खानच्या एका गाण्यावर मॅशअप सादर केले. तिच्या या सादरीकरणाचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.
DUa lipa SRK Song : गायिका दुआ लिपाच्या गाण्याचे जगभरात चाहते आहेत. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलं तरी तिचं नाव आणि तिनं गायलेल्या गाण्याचा चाहता सापडतोच. नुकतेच या गायिकेचा मुंबईमध्ये एक शो होता. या कॉन्सर्टमध्ये तिने लाईव्ह परफॉर्म करत अनेक गाणी गायली. तिच्या या कॉन्सर्टसाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक जमले होते. ती मूळची इल्बानियाची आहे. तिची गाणी इंग्रजी भाषेत असतात. पण तिने आपल्या या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये थेट बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरुख खानचं गाणं असलेलं एक मॅशअप सादर केलं. तिच्या या सादरीकरणाने सगळे प्रेक्षक अचंबित झाले.
दुआ लिपाची जगभरात क्रेझ
नुकत्याच संपलेल्या नोव्हेंबर महिन्याच्या 30 तारखेला दुआ लिपाचा मुंबईत एक लाईव्ह कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टसाठी ती आपल्या संपूर्ण टीमसह मुंबईत दाखल झाली होती. तिने या कॉन्सटदरम्यान अनेक धडाकेबाज गाणी सादर केली. गाणी, नृत्य यांचा मेळ साधत तिने आपल्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. दुआ लिपाची क्रेझ संपूर्ण जगात आहेत. तिला एकदा पाहण्यासाठी तिचे चाहते जीवाचं रान करतात. परिणामी तिच्या या लाईव्ह कॉन्सर्टसाठी हजारो लोकांनी हजेरी लावली होती. तिकीट खरेदी करून तिचा हा लाईव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी लोक मुंबईत जमले होते.
शाहरुखचं हिंदी गाणं असलेलं मॅशपअ सादर केलं
याच कॉन्सर्टमध्ये दुआ लिपाने तिचं लेव्हिटेटिंग हे जगप्रसिद्ध गाणं सादर केलं. हे गाणं सादर करत असताना प्रेक्षकही दंग झाले होते. प्रेक्षकही तिच्यासोबत गात होते. मात्र मध्येच काही सेकंदांसाठी थांबून तिने थेट शाहरूख खानच्या बादशाह या चित्रपटातील 'हा यहाँ कदम कदम पर लाखो हसिनायें है' हे गाणं चालू केलं. खरं म्हणजे तिने लेव्हिटेगिं आणि हा यहाँ कदम-कदम पर या दोन्ही गीतांचं मॅशअपच सादर केलं. तिच्या या अनपेक्षित सादरीकरणामुळे सगळेच प्रेक्षक अचंबित झाले.
📹 | @DUALIPA doing Indian dance moves during her performance of a “Levitating” / “Woh Ladki Jo” mashup at Zomaland Festival! (Via neha.deeva) pic.twitter.com/P3DBjCfhg6
— Dua Lipa Media (@STUDlO2054) November 30, 2024
कॉन्सर्टमध्ये टाळ्या आणि शिट्या
दुआ लिपा ही सिंगर थेट शाहरुख खानचं गाणं सादर करेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र तिच्या या अनपेक्षित सादरीकरणामुळे सगळ्याच प्रेक्षकांना चांगलाच आनंद झाला. मॅशअपमध्ये शाहरुख खानच्या गीत्याच्या ओळी लागताच प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांची बरसात केली. दुआ लिपाच्या या कृतीने समस्त प्रेक्षकांचं मन जिंकलं. सध्या तिने सादर केलेल्या या मॅशअपचा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होत आहे.
हेही वाचा :