Yodha New Release Date : सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा'ची रिलीज डेट ढकलली पुढे; नेटकरी म्हणाले,"कतरिनाला घाबरला का?"
Yodha Movie Release Date : 'योद्धा' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे.
Sidharth Malhotra Yodha New Release Date : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सध्या त्याच्या आगामी 'योद्धा' (Yodha) या सिनेमामुळे चर्चेत आहे. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. सिद्धार्थचा बहुचर्चित 'योद्धा' हा सिनेमा आता 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आधी हा सिनेमा 8 डिसेंब 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. आता हा सिनेमा 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 8 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार असल्याने बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या (Katrina Kaif) 'मेरी क्रिसमस' सिनेमासोबत या सिनेमाची टक्कर होणार होती.
View this post on Instagram
'योद्धा' या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रासह दिशा पटानी (Disha Patani) आणि राशी खन्ना (Raashii Khanna) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'योद्धा' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. पण आता सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याने चाहते नाराज झाले आहेत.
'योद्धा' कधी प्रदर्शित होणार? (Yodha New Release Date)
सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा' या सिनेमाची नवी रिलीज डेट समोर आली आहे. सिद्धार्थ मल्होत्राने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करत रिलीज डेट पुढे ढकलली असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. सिद्धार्थने दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तो सैनिकाच्या गेटअपमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे.
सिद्धार्थ मल्होत्राने 'योद्धा'चं नवं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"अॅक्शन आणि रोमांचचा धमाका करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तुम्हीदेखील सीट बेल्ट लावा, योद्धा 15 मार्च 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल". सिद्धार्थच्या या पोस्टमुळे 'योद्धा' हा सिनेमा 15 मार्च 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट होत आहे". सिद्धार्थच्या पोस्टवर आता फक्त योद्धाची प्रतीक्षा, कमाल लूक, योद्धा बॉय, कतरिनाला घाबरला का अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
संबंधित बातम्या