Pushpa 2: 'आपल्याकडे गर्दी तर जेसीबी पाहण्यासाठीही होते...', 'पुष्पा 2' च्या यशावर प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत
Pushpa 2: बॉक्स ऑफिसवर सध्या पुष्पा 2 सिनेमा सध्या धुमाकूळ घालतोय. पण याच सिनेमाच्या यशावर एका प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य सध्या चर्चेत आलंय.
Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा 2 (Pushpa 2) या सिनेमाने प्रेक्षकांना सध्या वेड लावलंय. वीकेंडसह अगदी इतर दिवशीही सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. अवघ्या काही दिवसांतच सिनेमाने 500 कोटींचाही टप्पा पार केला आहे. आतापर्यंत बरेच रेकॉर्ड्स या सिनेमाने मोडले आहेत. त्यामुळे सध्या सर्वच स्तरातून पुष्पा 2 आणि अल्लू अर्जुनचं कौतुक होतंय. असं असतानाच अभिनेता सिद्धार्थने (Siddharth) सिनेमावर टीका केली असल्याचं पाहायला मिळतंय.
सिद्धार्थ अलीकडेच एका कार्यक्रमात गेला होता जिथे त्याने पुष्पा 2 च्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी जमलेल्या चाहत्यांची तुलना जेसीबीशी केली. यानंतर अल्लू अर्जुनचे चाहते चांगलेच संतापले आहेत. सिद्धार्थच्या या वक्तव्याची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. त्यातच गर्दीचा अर्थ उत्तम दर्जा असाच होत नाही, असंही यावेळी सिद्धार्थने म्हटलं आहे.
सिद्धार्थने नेमकं काय म्हटलं?
फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ म्हणाला की, आपल्या देशात जेसीबीने खोदकाम केलं जातं तेव्हा गर्दी जमते. त्यामुळे बिहारमध्ये अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होणे असामान्य नाही. भारतात गर्दी म्हणजे फक्त उत्तम दर्जा असा होता नाही. असं जर असेल तर सर्वच राजकीय पक्ष जिंकले असते.
अल्लू अर्जुन पुष्पा 2 हा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असतानाच सिद्धार्थचं हे वक्तव्य चर्चेत आलंय. या चित्रपटात अल्लू अर्जुन पुष्पा राजच्या भूमिकेत आहे. पुष्पा 2 चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने जगभरात 800 कोटींचा आकडा पार केला आहे. भारतातही पुष्पा 2 ने स्त्री 2 ला मागे टाकले आहे. या चित्रपटाने भारतातच 600 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Kajol On Electricity Bill: घराच्या विजेच्या बिलावर काजोलचा संताप, पोस्ट शेअर करत म्हणाली...