Siddharth Aditi Marriage : गुपचूप... गुपचूप... अभिनेता सिद्धार्थ दुसर्यांदा अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
Siddharth Aditi Marriage : एका खासगी सोहळ्यात दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. यावेळी जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते.
![Siddharth Aditi Marriage : गुपचूप... गुपचूप... अभिनेता सिद्धार्थ दुसर्यांदा अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल! siddharth aditi marriage Aditi Rao Hydari And Siddharth Are Now Married See First Pics Of Newlyweds couple Siddharth Aditi Marriage : गुपचूप... गुपचूप... अभिनेता सिद्धार्थ दुसर्यांदा अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/16/850f701916313050c0c2ffb4e6767a4a1726469675675290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Siddharth Aditi Marriage : मराठीसह बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी कपल्सने मागील काही महिन्यात लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) विवाहबंधनात अडकला आहे. अदिती राव हैदरीने इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. एका खासगी सोहळ्यात दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. यावेळी जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते.
सिद्धार्थ आणि अदिती यांनी वर्षी मार्च महिन्यात तेलंगणामधील एका मंदिरात साखरपुडा उरकला होता. त्यानंतर हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. अखेर दोघांनी आता लग्नगाठ बांधली. अदितीने आपल्या विवाह सोहळ्यातील खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोसह तिने आपली भावना व्यक्त करणारे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थ आणि अदिती हे 2021 मध्ये तामिळ-तेलुगू भाषेतील चित्रपट 'महा समुद्रम'च्या सेटवर भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, या दोघांनी या चर्चांवर भाष्य केले नव्हते. मात्र, नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अदिती राव हैदरीने सिद्धार्थसोबतचे नाते मान्य केले होते. त्यानंतर मार्च महिन्यात त्यांनी साखरपुडा केला.
View this post on Instagram
अदिती आणि सिद्धार्थचा दुसरा विवाह
अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांचे हे दुसरे लग्न आहे. अदितीचा पहिला विवाह हा अभिनेता सत्यदिप मिश्रासोबत झाला होता. अदितीचा पहिला विवाह वयाच्या 24 व्या वर्षी झाला होता. मात्र, अदितीने सिनेसृष्टीत नशीब आजमावण्यास सुरुवात केल्याने लग्नाची लपवण्यात आली होती. काही वर्षानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अभिनेता सिद्धार्थ याने दिल्लीतील मेघना नारायण हिच्यासोबत 2003 मध्ये विवाह केला होता. मात्र, लग्नाच्या चार वर्षातच दोघांमध्ये वाद होई लागल्याने अखेर त्यांनी 2007 मध्ये घटस्फोट घेतला. अभिनेता सिद्धार्थ आणि अभिनेत्री श्रुती हसन यांच्यातही प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)