Shweta Tiwari : श्वेता तिवारी तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार? अभिनेत्री म्हणाली, 'मला लग्न करायचं...'
Shweta Tiwari : बॉलीवूड अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे कायमच चर्चेत असते. त्यातच तिला लग्नाचा विषयी अनेकांच्या चर्चेचा विषय असतो.
Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिच्या सोशल मीडियावरील पोस्ट या अनेकांच्या चर्चेचा विषय असतो. त्याचप्रमाणे तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. तिच्या करिअरमध्येही श्वेताने खूप प्रगती केली आहे. तिच्या अभिनयाचे आजही लाखो चाहते आहेत. पण तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही श्वेता बरीच चर्चेत असते. श्वेताचं पहिलं लग्न तिने वयाच्या 18 व्या वर्षी झालं होतं. पण तिचं ते लग्न मोडलं. त्यानंतर तिने दुसरं लग्न केलं जेही फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर तिच्या तिसऱ्या लग्नाची देखील बरीच चर्चा सुरु असते.
श्वेता तिवारी ही मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. पण तिचं वैयक्तिक आयुष्य हे विशेष करुन चर्चेत असतं. 43 वर्षांची ही अभिनेत्री तिच्या फिटनेस आणि लूक्समुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. त्यातच आता ती आता सिंघममध्येही झळकणार आहे. त्यातच तिचा दोनदा घटस्फोट झालाय. तसेच तिला दोन मुलं देखील आहे. पण प्रत्येकवेळी तिला तिच्या लग्नामुळे बरंच ट्रोल केलं जातं.
श्वेता तिवारी तिसऱ्यांदा लग्न करणार?
तिच्या दोन घटस्फोटानंतर ती आता तिसरं लग्न कधी करणार असा खोचक प्रश्न अनेकदा विचारला जातो. श्वेताने तिच्या जुन्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, मला अनेकांकडून तिसरं लग्न करुन नकोस असा सल्ला देखील दिला जातो. पुढे श्वेताने म्हटलं की, तुम्ही अगदी 10 वर्ष लिव्हइनमध्ये राहून तुमच्या पार्टनरला सोडलं तर तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. पण हेच तुम्ही लग्नाच्या दोन वर्षातच घटस्फोट घेतला तर तुम्हाला लोकं लगेच प्रश्न विचारतात.
तिसरं लग्न करण्याच्या प्रश्नावर श्वेताचं उत्तर
दरम्यान श्वेताने याच मुलाखतीमध्ये तिसऱ्या लग्नावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना चांगलच ठणकावलं आहे. तिनं म्हटलं की, मला तिसरं लग्न नको करु असं सांगणारे हे लोक कोण आहेत? हे माझं आयुष्य आहे आणि त्याचा निर्णयही मिच घेणार. श्वेता तिवारी वयाच्या 18 व्या वर्षी राजा चौधरीसोबत लग्नबंधनात अडकली. त्यावेळी तिचं कुटुंब तिच्या निर्णयाविरोधात होतं. पण तरीही कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिने राजा चौधरीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दोन वर्षानंतर श्वेता तिवारीने आपली लेक पलक तिवारीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांच्यात दुरावा आला. लग्नाच्या 9 वर्षानंतर श्वेता आणि राजा यांचा घटस्फोट झाला. 2007 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर श्वेताने एकटीनेच आपल्या लेकीचा सांभाळ केला. पुढे तिच्या आयुष्यात 2012 मध्ये अभिनव कोहलीची एन्ट्री झाली. काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनवसोबत दुसरं लग्न केल्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. 2019 मध्ये ती दुसऱ्या पतीपासूनही विभक्त झाली.