Shiv Thakare : 'बिग बॉस' फेम शिव ठाकरेची सोशल मीडियावर हवा; इन्स्टाग्रामवर पार केला 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा
Shiv Thakare : शिव ठाकरेने इन्स्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.
Shiv Thakare : शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस' अर्थात 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) गाजवत आहे. अशातच शिवने आता नवा रेकॉर्ड केला आहे. इन्स्टाग्रामवर शिवने 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.
शिवने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना 1 मिलियन फॉलोअर्स संदर्भात माहिती दिली आहे. शिवने लिहिलं आहे,"स्वप्न बघणं ही सोपी गोष्ट असते. पण ती स्वप्न साकार करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्ही मेहनत घेत असाल आणि तुमची स्वप्न साकार करणारी मंडळी तुमच्यासोबत असतील तर सगळं काही शक्य होतं".
शिव पुढे म्हणाला,"मी खूप नशीबवान आहे की तुमच्यासारखी मंडळी माझ्यासोबत आहेत. माझं प्रत्येक स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत आहात. तुमच्या प्रेम असचं राहुदे ... खूप खूप आभार". शिवच्या या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
शिवच्या पोस्टवर "भावा आम्ही तुझ्या पाठिशी आहोत, भावड्या खूप-खूप अभिनंदन, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो, खूप पुढचा पल्ला गाठायचा आहे, 'बिग बॉस 16'चा विजेता शिव ठाकरेचं, 'बिग बॉस 16'ची ट्रॉफी तुझ्या हातात हवी, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
शिव ठाकरे 'बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे. सध्या तो हिंदी बिग बॉस गाजवत आहे. 'बिग बॉस 16'चं पर्व आता अंतिम टप्प्यात आलं असून या पर्वाचा शिव ठाकरे विजेता व्हावा अशी चाहत्यांची इच्छा आहे. शिवची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
संबंधित बातम्या