एक्स्प्लोर

Shilpa Shetty Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टी-राज कुंद्रांच्या अडचणीत वाढ, सराफा व्यापाऱ्याकडून फसवणूक केल्याची तक्रार, कोर्टाने दिले तपासाचे आदेश

Shilpa Shetty Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा या दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Shilpa Shetty Raj Kundra :   अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा ( Raj Kundra) या दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एका सराफा व्यापाऱ्याने सोनं गुंतवणूक योजनेत शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि अन्य लोकांनी फसवणूक केली असल्याची सांगत कोर्टात धाव घेतली. त्यानंतर शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.  

मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयाने सांगितले की, शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.त्यानंतर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एनपी मेहता यांनी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) यांना सराफा व्यापारी पृथ्वीराज सरेमल कोठारी यांच्या तक्रारीत केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय, न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जर तपासानंतर आरोप खरे सिद्ध झाले तर पोलिसांनी या प्रकरणी आयपीसीच्या सर्व आवश्यक कलमांतर्गत एफआयआर नोंदवावा असेही कोर्टाने निर्देश देताना म्हटले आहे. 

2014 मध्ये सुरू केली होती गुंतवणूक योजना

पृथ्वीराज कोठारी यांनी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कुंद्रा दाम्पत्याने 2014 मध्ये एक योजना सुरू केली होती. यामध्ये गुंतवणूकदारांसाठी एक योजना होती की अर्ज करताना त्यांना सवलतीच्या दराने सोन्याचे आगाऊ पैसे भरण्यास सांगितले जायचे आणि त्यानंतर गुंतवणूक योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर ठरलेल्या किमतीचे सोने दिले जाणार होते. 

आश्वासनानुसार मिळाले नाही सोनं

आरोपींनी केलेल्या दाव्याच्या आधारे, कोठारी यांनी 2 एप्रिल 2019 रोजी आपल्याला 5,000 ग्रॅम 24 कॅरेट सोने दिले जाईल या विश्वासावर पंचवार्षिक योजनेअंतर्गत 90 लाख 38 हजार 600 रुपये गुंतवले. मात्र, कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार ठरलेले सोनं देण्यात आले नाही. तक्रारीत म्हटले की, आरोपींनी एक प्रकारे बोगस गुंतवणूक योजना आखून फसवणुकीचा कट आखला.

दरम्यान, राज कुंद्रा यांच्याविरोधात याआधीच ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू आहे. ईडीने काही स्थावर मालमत्ताही जप्त केली आहे. तर, अॅडल्ट फिल्म प्रकरणीही राज कुंद्राविरोधात आरोप आहेत. राज कुंद्रा सध्या जामिनावर आहे. 

इतर महत्त्वाची बातमी  :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Crime News : चिंताजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषणWalmik Karad Flat In Pimpari : पिंपरी-चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅटSuresh Dhas PC : कराडांसोबत पोलिसांच्या गाडीत बसलेला रोहित कोण? धसांनी सर्व सांगितलंABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 09 AM 15 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
झोमॅटो अन् जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची निफ्टी 50 एंट्री होणार, कोणते दोन शेअर बाहेर जाणार?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
वाल्मिक कराडने जिथून बीडचा राज्यशकट चालवला त्याच जगमित्र कार्यालयात महत्त्वाची बैठक, धनुभाऊ परळीत दाखल
Embed widget