Shefali Shah: 'तो माझ्या जवळून गेला आणि...'; शेफाली शाहनं सांगितला 'तो' धक्कादायक अनुभव
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शेफाली शाहनं (Shefali Shah) तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक अनुभवाबद्दल सांगितलं.
Shefali Shah On Being Touch Inappropriately: अभिनेत्री शेफाली शाह (Shefali Shah) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकते. तिनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शेफाली शाहनं तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक अनुभवाबद्दल सांगितलं.
एका पॉडकास्टमध्ये शेफालीनं मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग या चित्रपटाबद्दल सांगितलं. या चित्रपटात तिने लहानपणी लैंगिक शोषण झालेल्या महिलेची भूमिका साकारली होती. यावेळी शेफालीनं तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला. शेफाली म्हणाली, 'मला आठवतंय, मी एकदा बाजारात गेले होते, तेव्हा एक माणूस माझ्या जवळून गेला आणि त्याने मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. तो अनुभव खूप वाईट होता, मला त्याबद्दल विचार करुन खूप खराब वाटतं. मी याबद्दल काहीही बोलले नाही कारण'
शेफालीला पुढे पॉडकास्टमध्ये विचारण्यात आले की, 'तू त्याला असं इनवाइट करण्यासाठी काही केले असेल, असे अनेक वेळा तुला वाटलं असेल'. तर या प्रश्नावर शेफालीनं उत्तर दिले, "हो, मी तुमच्याशी सहमत आहे. अशा प्रसंगानंतर आपणच अपराधी आहोत, अशी भावना तुमच्या निर्माण होते , तुम्हाला लाज वाटते आणि तुम्हाला हे सर्व विसरावे असेही वाटते.'
View this post on Instagram
शेफाली शाहचे चित्रपट
शेफाली शाह ही नुकतीच 'दिल्ली क्राइम', 'डॉक्टर जी' आणि 'डार्लिंग्स' या चित्रपट आणि सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. आलिया भट्टच्या 'डार्लिंग्स'चित्रपटात तिने घरगुती हिंसाचार पीडितेच्या आईची भूमिका साकारली होती. शेफालीने 1998 मध्ये राम गोपाल वर्मी यांच्या सत्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.या चित्रपटातील शेफालीच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केलं. याशिवाय शेफालीने 'गांधी माय फादर', 'दिल धडकने दो', 'ब्रदर्स', 'द जंगल बुक' आणि 'कमांडो' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. शेफाली शाहचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
शेफालीचा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. तिला इन्स्टाग्रामवर 879K फॉलोवर्स आहेत. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.
महत्वाच्या इतर बातम्या: