Tunisha Sharma: 'तुझी आठवण येते...'; तुनिषा शर्माच्या बर्थ-डेला शिझानच्या बहिणीनं शेअर केली पोस्ट
शिझानची बहिण फलक नाजनं (Falaq Naaz) सोशल मीडियावर तुनिषासोबतचे (Tunisha Sharma) काही फोटो शेअर केले आहेत.
Tunisha Sharma: अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) वयाच्या 20 व्या आत्महत्या केली. तिच्या निधनानं अनेकांना धक्का बसला. तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा-दास्तान ए काबुल' या मालिकेच्या सेटवर गळफास घेतला. काल (4 जानेवारी) तुनिषाचा वाढदिवस होता. यानिमित्तानं शिझानची बहिण फलक नाजनं (Falaq Naaz) सोशल मीडियावर तुनिषासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
फलक नाजचे फोटो
फलक नाजनं तुनिषासोबतचे काही फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'टुन्नू मेरा बच्चा, तुला अशा शुभेच्छा द्यावा लागतील, असा विचार कधीच केला नव्हता. अप्पीने तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे, हे तुला माहीत होतं. मला तुला प्रिंसेसच्या ड्रेसमध्ये पाहायचा होता. मी तुला तयार केले असते, तुझ्यासाठी केक बनवला असता. मला तुझा तो आश्चर्यचकित झालेला चेहरा पहायचा होता. टुन्नू, मला काय म्हणायचे आहे ते तुला चांगलेच माहीत होते. मला खूप वाईट वाटलं आहे. तू गेल्यापासून जेवढं दु:ख मला होत आहे, तेवढं दु:ख मला कधीच झालं नव्हतं.'
'कधी कधी कोणासाठी प्रार्थना करावी, हे मला समजत नाही. तुझ्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रर्थाना करावी किंवा आमच्या (शिजन, अम्मी आणि मी) आयुष्याच्या या कठीण परीक्षेसाठी प्रार्थना करावी, हे मला कळत नाही. मला माहित आहे, तू हे सर्व बघत आहेस. तू माझ्या आजूबाजूला आहेस, मला ते जाणवते. टुन्नू, आम्हाला रोज तुझी आठवण येते. तू आमच्या हृदयात सदैव जिवंत राहाल. मला आशा आहे की तुझी शांततेची शोध संपला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मी पण तुझ्यावर प्रेम करतो.' असंही फलकनं पोस्टमध्ये लिहिलं.
View this post on Instagram
तुनिषाच्या आत्महत्येला शिझान जबाबदार आहे, असे आरोप शिझानवर गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं. सध्या त्याची चौकशी सुरू असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा आणि शिझान खानचा ब्रेकअप कसा झाला? बहिण फलक नाजचा खुलासा