Sharad Ponkshe : मला मुस्लिमांची भीती वाटत नाही.... शरद पोंक्षेंची पोस्ट व्हायरल
Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट केली आहे.
Sharad Ponkshe Post : मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या विषयांवर, घडामोडींवर ते त्यांची मतं सोशल मीडियावर मांडत असतात. शरद पोंक्षे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहित आहे. आता याच विषयावर आधारित एक खळबळजनक पोस्ट त्यांनी केली आहे.
शरद पोंक्षेंची पोस्ट काय आहे? (Sharad Ponkshe Post)
शरद पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एका विधानाचा फोटो शेअर केला आहे. त्यावर लिहिलेलं आहे की,"मला मुस्लिमांची भीती वाटत नाही. इंग्रजांची भीती वाटत नाही. हिंदूंची भीती वाटते, हिंदूनीच आज हिंदुत्वाशी वैर सुरू केले आहे". हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"ही आहे सावरकर विचारांची धार".
View this post on Instagram
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारावर आधारित असलेली शरद पोंक्षे यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टवर भीती नाही चिड येते, आजची सत्य परिस्थिती आहे, 100% अगदी खरं आहे अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. शरद पोंक्षे यांचा हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रचंड अभ्यास आहे. व्याख्यानाच्या माध्यमातून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवत असतात.
शरद पोंक्षे याआधीदेखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. पुण्यातील एका कार्यक्रमात ते म्हणाले होते,"सावरकर यांचे मोठेपण मान्य करणे म्हणजे काही जणांना राजकीय तोटा वाटतो. सावरकर फार मोठे देशभक्त होते. सावरकरांची दहशत वाढली पाहिजे. यापुढे सावरकर प्रेमी आला असं म्हटलं तरी भीती वाटली पाहिजे".
शरद पोंक्षे सध्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'उंच माझा झोका', 'असे हे कन्यादान', 'राधा ही बावरी' अशा अनेक मालिकांमध्ये ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. तसेच, 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातील त्यांची नथुरामची भूमिकाही प्रचंड गाजली होती. शरद पोंक्षे यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. त्यांचं 'दुसरे वादळ' हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे.
संबंधित बातम्या