एक्स्प्लोर

शेतकरी चाहत्यासोबत शंकर महादेवन गाणं गाणार!

“उन्नई कान्नधू नान इंद्रू नाल इल्लये” हे तो गात असलेलं गाणं कमल हसनच्या विश्वरुपम सिनेमातलं आहे आणि गाण्याचा मूळ गायक स्वत: शंकर महादेवन आहेत.

मुंबई : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी परवा फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात शेतामध्ये झाडाच्या सावलीत बसून एक माणूस मन लावून गाताना दिसतोय. मागे केळीचा बागेसारखी शेती दिसतेय, या माणसाने डोक्याला लाल रुमाल गुंडाळलेला, कपडे मळलेले आहेत. “उन्नई कान्नधू नान इंद्रू नाल इल्लये” हे तो गात असलेलं गाणं कमल हसनच्या विश्वरुपम सिनेमातलं आहे आणि गाण्याचा मूळ गायक स्वत: शंकर महादेवन आहेत. हा व्हायरल व्हिडिओ शंकरने ऐकला, त्याच्या आवाजाने भारावलेल्या शंकरने या माणसाला शोधायचं ठरवलं, त्याने फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटरवर हा व्हिडिओ टाकला. आपल्या पोस्टमध्ये शंकर महादेवन म्हणतात, “याला म्हणतात घामाचं, श्रमाचं फळं...हे सूर जिथे जन्म घेतात त्या आपल्या देशाचा आपल्या संस्कृतीचा खूप अभिमान वाटतो. कोण आहे हा माणूस? मी याच्यापर्यंत कसा पोहोचू? मला याच्यासोबत काम करायला आवडेल, त्याला शोधायला माझी मदत करा.” पोस्टनंतर 24 तासात शंकर महादेवन, त्या आवाजाच्या गायकापर्यंत पोहोचलेही. त्याचं नाव राकेश उन्नी, राकेश केरळातील अलप्पी जवळच्या नुरानाडू गावचा.. रबर शेतीत रोजंदारीवर तो काम करतो, रबर कट करायचं, ते खांद्यावर वाहून न्यायचं आणि ट्रकमध्ये लोड करायचं हे त्याचं रोजचं काम. त्याने गाण्याचं कोणतंही शिक्षण घेतलं नव्हतं हे विशेष. तिथल्या गावात गायन स्पर्धेत, मेळ्यांमध्ये तो नियमित गातो. शुक्रवारी रबर कटिंगच्या कामातून थोडी उसंत मिळाली तेव्हा तो गाऊ लागला, त्याचा ट्रक ड्रायव्हर मित्र शमीरने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला.. नंतर त्याची बहीण शमीलाने हा व्हिडिओ अपलोड केला.. अल्पावधीतच तो जगभरात व्हायरल झाला आणि मूळ गायक शंकर महादेवनपर्यंत पोहोचला, शंकरने ट्वीट, फेसबुक केल्यानंतर राकेशचं नशीबच फळफळलं. शंकर महादेवन यांनी राकेशचा नंबर मिळवला आणि त्याला कॉल केला, आपला आवाज खूप छान असल्याचं शंकर महादेवन यांनी सांगितलं तो क्षण कधीच विसरु शकत नाही असं राकेश सांगतो. “मला तुम्हाला एकदा भेटायची इच्छा आहे असं सांगितल्यावर फक्त भेटणारच नाही तर आपण दोघं एकत्र गाणार सुद्धा आहोत” असं शंकर महादेवनने राकेशला सांगितलंय. फक्त शंकरचं नाही तर इतर अनेक गायक संगीतकारांनीही राकेशला कॉल करुन शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियाचा चांगला वापर करता येऊ शकतो याचं हे उदाहरण आहे. पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratan Tata Pet Dog: रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाडका 'गोवा'ही दाखल, टाटांच्या आठवणीनं चाहत्यांचे डोळे पाणावले
रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाडका 'गोवा'ही दाखल, टाटांच्या आठवणीनं चाहत्यांचे डोळे पाणावले
Assembly Election: लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिलेले माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल
लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिलेले माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल
कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; प्रेक्षकांच्या भेटीला रांगडी प्रेमकथा, 'लय आवडतेस तू मला'
कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; प्रेक्षकांच्या भेटीला रांगडी प्रेमकथा, 'लय आवडतेस तू मला'
मोठी बातमी! आमदार बबनदादांच्या मनात नेमकं काय? भेटीनंतर जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, माढ्यात नेमकं काय होणार?  
मोठी बातमी! आमदार बबनदादांच्या मनात नेमकं काय? भेटीनंतर जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, माढ्यात नेमकं काय होणार?  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णयAmit Shah pays tributes Ratan Tata : अमित शाहांनी घेतलं रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनRatan Tata Funeral Superfast News : रतन टाटा अंत्यविधी : 10 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 10 ऑक्टोबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratan Tata Pet Dog: रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाडका 'गोवा'ही दाखल, टाटांच्या आठवणीनं चाहत्यांचे डोळे पाणावले
रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाडका 'गोवा'ही दाखल, टाटांच्या आठवणीनं चाहत्यांचे डोळे पाणावले
Assembly Election: लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिलेले माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल
लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिलेले माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल
कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; प्रेक्षकांच्या भेटीला रांगडी प्रेमकथा, 'लय आवडतेस तू मला'
कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; प्रेक्षकांच्या भेटीला रांगडी प्रेमकथा, 'लय आवडतेस तू मला'
मोठी बातमी! आमदार बबनदादांच्या मनात नेमकं काय? भेटीनंतर जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, माढ्यात नेमकं काय होणार?  
मोठी बातमी! आमदार बबनदादांच्या मनात नेमकं काय? भेटीनंतर जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, माढ्यात नेमकं काय होणार?  
Madha Assembly constituency : अजितदादांची साथ सोडलेले आमदार बबन शिंदे यांचे पुत्र जयंत पाटलांच्या भेटीला, माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली
अजितदादांची साथ सोडलेले आमदार बबन शिंदे यांचे पुत्र जयंत पाटलांच्या भेटीला, माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली
Ratan Tata : टाटा समूहाचा कोल्हापूरच्या उद्योगाशी ऋणानूबंध, दहा वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
टाटा समूहाचा कोल्हापूरच्या उद्योगाशी ऋणानूबंध, दहा वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
Ratan Tata Death: अलिबागच्या फार्म हाऊसवर उपचारासाठी आलेल्या डॉक्टरला कुत्रा कडकडून चावला, मग रतन टाटांनी  काय केलं?
अलिबागच्या फार्म हाऊसवर उपचारासाठी आलेल्या डॉक्टरला कुत्रा कडकडून चावला, मग रतन टाटांनी काय केलं?
Ratan Tata: मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच; राज ठाकरेंचं मोदींना पत्र
मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच; राज ठाकरेंचं मोदींना पत्र
Embed widget