एक्स्प्लोर
शंकर महादेवन नवी मुंबई महापालिकेचे स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबेसिडर
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांची निवड करण्यात आली आहे. नवी मुंबईच्या स्वच्छता मोहीमेसाठी शंकर महादेवन लवकरच एक गाणं संगीतबद्ध करणार आहेत.
यानिमित्ताने शंकर महादेवन यांनी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. पालिकेच्या स्वच्छता मोहिमेत मी पूर्ण सहकार्य करेन, असा विश्वास शंकर महादेवन यांनी यावेळी व्यक्त केला.
नवी मुंबई महापालिकेने एवढी मोठी संधी दिल्याबद्दल महादेवन यांनी आभारही मानले. शहराचा नागरिक या नात्याने स्वच्छता मोहिमेत महापालिकेला पूर्ण सहकार्य करणार, असं महादेवन यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement