Shamshera box office collection Day 4 : रणबीरच्या 'शमशेरा'ला प्रेक्षकांची नापसंती? जाणून घ्या आत्तापर्यंतचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘शमशेरा’ (Shamshera) या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे.
Shamshera box office collection Day 4 : अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘शमशेरा’ (Shamshera) या चित्रपटाची वाट त्याचे चाहचे उत्सुकतेने बघत होते. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. आता चित्रपटाचं बॉक्स ऑफिस पाहता या चित्रपटाला प्रेक्षकांची नापसंती मिळत आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
शमशेरा या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी (22 जुलै) 10.25 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी (23 जुलै) या चित्रपटानं 10.50 कोटींची कमाई केली. रविवारी (24 जुलै) म्हणजेच तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 11 कोटींची कमाई केली. तीन दिवसांमध्ये या चित्रपटानं 31.75 कोटींची कमाई केली. सोमवारी (25 जुलै) म्हणजेच रिलीज झाल्यानंतर तीसऱ्या दिवशी या चित्रपटानं 4 कोटींची कमाई केली आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 45 कोटी कमावले आहेत. सोमवारी या चित्रपटाच्या तिकीट बुकींगमध्ये 70 टक्के घट झाली आहे.
शमशेरा या चित्रपटातं दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केले आहे. रणबीर कपूर, संजय दत्त, वाणी कपूर यांच्यासोबतच रॉनित रॉय, आशुतोष राणा, सौरभ शुक्ला, आहाना कुमार आणि त्रिधा चौधरी यांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तब्बल 150 कोटींचे बजेट वापरून बनलेल्या या चित्रपटाला किमान 150 कोटींची कमाई करावी लागणार आहे. पण, चित्रपटाचा असा परफॉर्मन्स बघता या आकड्याची अपेक्षा कमी वाटत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान, 'शमशेरा' हा चित्रपट टोरेंट वेबसाईटवर लीक झाल्याची बातमी समोर आली होती.
शमशेरा या चित्रपटमध्ये रणबीर कपूरनं दुहेरी भूमिका साकारली आहे. रणबीरनं या चित्रपटासाठी 20 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. शमशेरा चित्रपटासाठी रणबीरनं त्याच्या बॉडी आणि लूककडे विशेष लक्ष दिलं.
हेही वाचा: