एक्स्प्लोर
मोदी सरकारच्या मोहिमेमुळे शाहरुख खानला नोटीस

मुंबई : काळा पैशाविरोधात केंद्र सरकारने श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या गुप्त संपत्तीचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. याच प्रकरणात बॉलिवूडचा किंग खान शाहरुखलाही आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. इन्कम टॅक्स विभागाने शाहरुखकडे बर्म्युडा, ब्रिटीश व्हर्जिन आयलंड आणि दुबईसारख्या परदेशातील गुंतवणुकीचा अहवाल मागितला आहे. आयकर अधिकाऱ्यांकडे भारतीय नागरिकांच्या परदेशी गुंतवणुकांबाबत सखोल माहिती आहे. मात्र शाहरुखच्या परदेशी गुंतवणुकांमध्ये काळ्या पैशाचा समावेश आहे, की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शाहरुखला 15 दिवसांपूर्वीच आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. आयटी अॅक्टच्या सेक्शन 131 अंतर्गत ही नोटीस धाडण्यात आली आहे. यामुळे आयकर अधिकाऱ्यांना तपास करण्याचा अधिकार मिळतो. शाहरुखच्या बिझनेस मॅनेजर करुणा बडवाल यांना ईमेलद्वारे पाठवलेल्या या नोटिशीला अद्याप कोणतंही उत्तर नाही.

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















