Shah Rukh Khan : कस्टम ड्युटी न भरल्यानं किंग खानला मुंबई विमानतळावर रोखलं; तासभर चौकशी, लाखोंचा भुर्दंड
Shah Rukh Khan : शाहरुख खानला मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने रोखलं असल्याची माहिती समोर आली.
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला (Shah Rukh Khan) मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने रोखलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याकडे काही महागडी घड्याळं आणि त्यांचे कव्हर होते. याची किंमत 18 लाख आहे. त्यामुळे शाहरुखला 6.83 लाखांची कस्टम ड्युटी भरावी लागली.
संपूर्ण प्रकरण काय?
शाहरुख खान एका कार्यक्रमासाठी दुबईला गेला होता. दुबईहून येत असताना कस्टम विभागाने शाहरुखला रोखलं. तब्बल एक तास शाहरुखची चौकशी सुरू होती. किंग खानच्या बॅगमध्ये अनेक महागड्या घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडले. या घड्याळांची किंमत लाखो रुपये आहे. पण त्याची कस्टम ड्युटी न भरल्याने शाहरुखची चौकशी करण्यात आली आहे. शाहरुखसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि बॉडीगार्डचीदेखील चौकशी करण्यात आली.
View this post on Instagram
शाहरुख एका खाजगी चार्टर VTR - SG ने आपल्या टीमसोबत दुबईत गेला होता. त्यावेळी कस्टम विभागाला शाहरुखच्या बॅगमध्ये लाखो रुपयांचे घड्याळे आणि त्या घड्याळांचे महागडे बॉक्स सापडले. त्यानंतर शाहरुखची चौकशी झाली. या प्रकारामुळे शाहरुखला 6 लाख 87 हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे.
शाहरुखचा बॉडी गार्ड रवीने 6 लाख 87 हजार रुपयांचा कर भरला आहे. हे बिल शाहरुखच्या बॉडी गार्डच्या नावावर आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बॉडी गार्डने भरलेले पैसे शाहरुखच्या क्रेडिट कार्डवरून भरण्यात आले आहेत. कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त युधवीर यादव यांनी ही संपूर्ण कारवाई केली आहे.
शाहरुख खान 41 व्या शारजाह इंटरनॅशनल बुक फेअर या कार्यक्रमासाठी दुबईत गेला होता. या कार्यक्रमातून परतत असताना मुंबई विमानतळावर त्याची अडवणूक करण्यात आली आहे. दरम्यान शाहरुखने 6.83 लाखांची कस्टम ड्युटी भरली असून अधिकाऱ्यांना सहकार्यदेखील केले आहे.
शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून 'पठाण' सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच शाहरुखला दुबईत 'ग्लोबल आयकॉन अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले आहे.सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी शाहरुखला ग्लोबल आयकॉनने सन्मानित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर सध्या शाहरुखचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
संबंधित बातम्या