एक्स्प्लोर

Main Hoon Na 2 : शाहरुख खान पुन्हा एकदा मेजर रामच्या भूमिकेत, 'मैं हू ना 2' चित्रपटाची तयारी सुरु

Main Hoon Na Sequel : शाहरुख खानचा 'मैं हू ना' या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटाचा सीक्वेल आणण्याची तयारी सुरु असल्याची माहिती आहे.

Shah Rukh Khan Main Hoon Na Sequel : बॉलिवूडमध्ये अलिकडच्या काळात सीक्वेल चित्रपटांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेक स्टार्सच्या चित्रपटांचे सीक्वेल बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. आता बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वेल येणार आहे. 'मैं हू ना' या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटाचा सीक्वेल आणण्याची तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

शाहरुख खान पुन्हा एकदा मेजर रामच्या भूमिकेत

'मैं हू ना' चित्रपट 2004 मध्ये आलेला सुपरहिट ब्लॉकबस्टर ठरला. फराह खानने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं, तर शाहरुख खान आणि  गौरी खान या चित्रपटाचे निर्माते होते. फराह खानने मैं हू ना' चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आणि तिचा हा पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. आता फराह खान लवकरच शाहरुख खानच्या या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटाचा दुसरा भाग आणणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फराह खान 'मैं हू ना 2' चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे, यासंदर्भात तिने शाहरुखशीही संपर्क साधल्याची माहिती आहे.

'मैं हू ना' चित्रपटाचा सीक्वेल येणार

शाहरुख खान आणि गौरी खान  'मैं हू ना' चित्रपटाचे निर्माते होते. 'मैं हू ना' शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंट बॅनरचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने थिएटरमध्ये रिलीज होताच धमाका केला. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय आणि गाणी सर्वच बाबींचं प्रेक्षकांनी तोंड भरुन कौतुक केलं. शाहरुख खान, गौरी खान यांनी या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीमध्ये निर्माता म्हणून डेब्यू केला, तर फराह खानने दिग्दर्शक म्हणून डेब्यू केला. हे दोन्ही डेब्यू हिट ठरले. 

'मैं हू ना 2' चित्रपटाची तयारी सुरु

शाहरुख खान आणि फराह खान यांनी 'मैं हू ना' चित्रपटानंतर अनेक हिट चित्रपट दिले. आता लवकरच शाहरुख आणि फराह खानची मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 'मैं हू ना 2' चित्रपटासाठी फराह खानने शाहरुख खानशी संपर्क केला असून शाहरुखनेही या चित्रपटाला हिरवा झेंडा दाखवल्याची माहिती आहे.  पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, फराह खान लवकरच 'मैं हू ना 2' साठी काम सुरु करणार असल्याची माहिती आहे, सध्या ती चित्रपटाच्या स्क्रीनप्लेवर काम करत आहे.

कथा आणि स्क्रीनप्लेवर काम सुरु

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान आणि फराह खान 'मैं हू ना' चित्रपटाचा गांभीर्याने विचार करत असून लवकरच यावर काम सुरु करणार आहेत.  चित्रपटाची कथा आणि स्क्रीनप्लेसाठी सध्या वेगवेगळ्या कल्पना शोधण्याचं काम सुरु आहे, कारण या चित्रपटाची कथा पहिल्या चित्रपटासारखी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी हवी.  'मैं हू ना' चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता, त्याचा सीक्वेलही तितकाच दमदार असणं गरजेचं आहे.

'मैं हू ना 2'बद्दल लवकरच घोषणा होण्याची शक्यता

'मैं हू ना' चित्रपटाच्या सीक्वेलबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच फराह खान आणि शाहरुख खान चित्रपटाच्या स्क्रीनप्लेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. शाहरुख खानची लेक सुहाना खान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shah Rukh Khan : "तेरे बाप का राज हैं...?", नवख्या दिग्दर्शकावर भडकला शाहरुख खान; शूट सोडून थेट डायरेक्टरला मारायला धावला

महत्त्वाच्या बातम्या

Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
Embed widget