Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
Shah Rukh Khan : शाहरुख खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुखचा हा फोटो किंग चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे असे म्हटले जात आहे.
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) काही दिवसांपासून 'IPL 2024'मुळे चर्चेत आहे. शाहरुखची टीम KKR ने यंदाची आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. आयपीएल संपताच शाहरुख खानने त्याच्या आगामी प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे. शाहरुख खान दिग्दर्शक सुजॉय घोषच्या 'किंग' (King) या चित्रपटात काम करताना दिसणार असून त्याची मुलगी सुहाना खानही यात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. शाहरुख खानने 'किंग' चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक फोटो व्हायरल होत आहे, जो 'किंग' चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील असल्याचे बोलले जात आहे.
शाहरुख खानचा फोटो होतोय व्हायरल
सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक फोटो व्हायरल होत आहे. शाहरुखचा हा फोटो त्याच्या 'किंग' चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील आहे. शाहरुख खान नेव्ही ब्लू सूटमध्ये दिसत आहे. शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाबाबत दावा केला जात आहे की, त्याचे शूटिंग स्पेनमध्ये होत आहे. शाहरुख खानबद्दल बोलले जात होते की तो 'किंग' चित्रपटात डॉनची भूमिका साकारणार आहे.
#EXCLUSIVE
— Harsh Mishra.. (@iamharsh55) June 1, 2024
First leak pic from the sets of #KING #SRK is currently shooting in Spain for the film. 🔥 pic.twitter.com/JJv7waFJYt
2024 मध्ये शाहरुख खानचा एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही
शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा डिसेंबर 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या डंकी चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. शाहरुख खानकडे असे अनेक चित्रपट आहेत ज्यांची चाहत्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख खानच्या 'किंग' या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर त्याची मुलगी सुहाना खानही यात दिसणार आहे. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा वडील आणि मुलगी एका चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. सुहाना खानने गेल्या वर्षी 2023 मध्ये दिग्दर्शिका झोया खानच्या 'द आर्चिज' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
शाहरुख खान होता रुग्णालयात दाखल
उष्माघाताचा त्रास झाल्याने शाहरुख खानला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शाहरुख 'कोलकाता नाईट रायडर्स'चा सामना पाहायला गेला होता. त्यावेळी त्याला उष्माघाताचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आता मात्र त्याची प्रकृती स्थिर आहे. शाहरुखच्या 'कोलकाता नाइट रायडर्स' या टीमने 'आयपीएल 2024'च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) या चित्रपटातही SRK झळकणार आहे.
संबंधित बातम्या