एक्स्प्लोर
तर तुमचं मुंडकं उडवेन, शाहरुखने अब्राम-आर्यनला सुनावलं
मुंबई : बंगळुरुतील विनयभंगाच्या घटनेनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपापली प्रतिक्रिया देत आहेत. किंग खान शाहरुखनेही यावर संताप व्यक्त करताना आपल्या मुलांचा दाखला दिला. त्यांनी एखाद्या महिलेला दुखावल्यास त्यांचं मुंडकं उडवेन, असं शाहरुख म्हणाला.
प्रत्येक पुरुषाने महिलांचा आदर राखायलाच हवा. स्त्रियांना सन्मानपूर्वक वागणूक द्यायला हवी, असं मत व्यक्त केलं. 'फेमिना' मासिकाला दिलेल्या मुलाखतीत किंग खानने भावना बोलून दाखवल्या.
शाहरुखला आर्यन आणि अब्राम ही दोन मुलं आहेत. महिलांचा अनादर करणाऱ्या पुरुषांचा आपल्याला किती तिटकारा आहे, हे सांगण्यासाठी एसआरकेने लेकांचं उदाहरण दिलं. आर्यन किंवा अब्रामने कुठल्याही महिलेला दुखावलं तर मी त्यांचं डोकं छाटेन, अशा शब्दात शाहरुखने चीड व्यक्त केली.
'कुठल्याही महिलेला दुखावू नका, असं मी माझी मुलं आर्यन आणि अब्रामला नेहमी बजावत असतो. जर तुम्ही तसं केलंत, तर मी तुमचा शिरच्छेद करेन. काळ अजिबात बदलला नाही. कोणतीही मुलगी ही तुमची लंगोटीयार नाही. तिच्याविषयी थोडा आदर दाखवा' असं आपण लेकांना बजावल्याचं शाहरुखने म्हटलं आहे.
आतापर्यंत अनुष्का शर्मा, शाहरुख खान, अक्षय कुमार, आमीर खान यासारख्या अनेक कलाकारांनी बंगळुरुतील विनयभंगाप्रकरणी संताप व्यक्त केला होता. राजकारण्यांवर चीड व्यक्त करतानाच पुरुषांनी महिलांशी नीट वागावं आणि महिलांनी प्रतिकार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement