Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या आयुष्यावर आधारित असणार आर्यनची 'स्टारडम'? बाप-लेक करणार धमाका
Aryan Khan Web Series : आर्यन खानची (Aryan Khan) 'स्टारडम' (Stardom) ही सीरिज शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आयुष्यावर आधारित आहे.
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष गाजवलं असून आता 2024 गाजवायला तो सज्ज आहे. शाहरुखचा लेक आर्यनदेखील (Aryan Khan) 'स्टारडम' (Stardom) या सीरिजच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टी गाजवायला सज्ज आहे. अशातच आता आर्यनची ही सीरिज शाहरुखच्या आयुष्यावर आधारित असल्याची चर्चा रंगली आहे.
शाहरुख खान आपल्या लेकाला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. पण आर्यन अभिनेता म्हणून नव्हे तर लेखक आणि दिग्दर्शक म्हणून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवत आहे. आर्यनची पहिली कलाकृती कोणती असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
शाहरुखच्या आयुष्यावर आधारित 'स्टारडम'?
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, 'स्टारडम' ही सीरिज दिल्लीत राहणाऱ्या एका मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे. ज्याला सिनेसृष्टीत नाव कमवायचं आहे. सुपरस्टार होण्याच्या प्रवासात एका मुलाला आयुष्यात करावे लागणारे चढ-उतार दाखवण्यात आले आहेत. हा मुलगा म्हणजे शाहरुखच असल्याची शक्यता चाहत्यांकडून वर्तवली जात आहे".
View this post on Instagram
मीडिया रिपोर्टनुसार, आर्यन खान आपल्या वडिलांची गोष्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहरुख खानच्या आयुष्यासंबंधित अनेक गोष्टी या सीरिजमध्ये उलगडण्यात येणार आहेत.पण शाहरुखच्या आयुष्यावर 'स्टारडम' आधारित असल्याचा कोणताही दावा, अद्याप करण्यात आलेला नाही. हा बायोरिक नाही. पण शाहरुखच्या आयुष्याची झलक या सीरिजमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे.
'स्टारडम'बद्दल जाणून घ्या...
'स्टारडम' या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा आर्यन खानने सांभाळली आहे. सहा भागांची ही सीरिज आहे. या सीरिजमध्ये अभिनेता लक्ष्य लालवानी आणि राम कपूरची पत्नी गौतमी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'स्टारडम'ची घोषणा झाल्यापासून ही सीरिज चर्चेत आहे.
शाहरुख खानचा 'डंकी' (Dunki) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजआधीपासून चर्चेत असणाऱ्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. भारतात या सिनेमाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. शाहरुखपेक्षा प्रभासच्या सालार या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. डंकीने रिलीजच्या 13 दिवसांत 200.62 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं आहे.
संबंधित बातम्या