Shah Rukh Khan: 'जर मी हिंदू असतो तर...'; पठाण वादादरम्यान शाहरुखचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
शाहरुखचा (Shah Rukh Khan) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती शाहरुखला विचारतो की, 'जर तू हिंदू असता तर ?' या प्रश्नाला शाहरुखनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चत आहे. देशभरातील अनेक लोक शाहरुखला पठाण चित्रपटामुळे ट्रोल करत आहेत. पठाण या चित्रपटातील बेशरम रंग गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं. त्यानंतर शाहरुखचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पठाण चित्रपटाच्या वादादरम्यान आता शाहरुखचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसते एक व्यक्ती शाहरुखला विचारतो की, 'जर तू हिंदू असता तर ?' या प्रश्नाला शाहरुखनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
शाहरुखच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती शाहरुखला प्रश्न विचारतो की, 'जर तू हिंदू असता आणि तुझं नाव शेखर कृष्ण असतं तर?' त्यावर शाहरुख म्हणतो. 'शेखर राधा कृष्ण, एसआरके' त्यानंतर शाहरुखचं हे वाक्य ऐकून त्या कार्यक्रमातील उपस्थित लोक टाळ्या वाजवतात.
तो व्यक्ती शाहरुखला प्रश्न विचारतो, 'शेखर राधा कृष्ण असं तुझं नाव असतं तर, लोकांचा तुला कसा प्रतिसाद मिळाला असता?' या प्रश्नाचं शाहरुख उत्तर देतो. शाहरुख म्हणतो, 'मला नाही वाटतं त्याचा काही फरक पडला असता. कलाकार हा समाजाच्या, पंथाच्या पलिकडे विचार करतो. तो कलाकार प्रेक्षकांना आवडतो किंवा नाही आवडत. तुम्ही मला कोणत्याही नावाने हाक माराल तरीही मला ते आवडेल.'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
पठाण हा चित्रपट 8 देशांमध्ये शूट झाला आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तानमध्ये याचे चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. शाहरुखसोबतच पठाण चित्रपटात दीपिका पादुकोण देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: