![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jawan Leaked Online : शाहरुख खानला मोठा फटका; 'जवान' रिलीज होताच ऑनलाईन लीक
Jawan : 'जवान' हा सिनेमा रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला आहे.
![Jawan Leaked Online : शाहरुख खानला मोठा फटका; 'जवान' रिलीज होताच ऑनलाईन लीक Shah Rukh Khan Jawan Leaked Online Shah Rukh Khan new movie available to watch download for free know details bollywood Entertainment Jawan Leaked Online : शाहरुख खानला मोठा फटका; 'जवान' रिलीज होताच ऑनलाईन लीक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/6931fa7f5d94de4611fd52b5136590681694065306974254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shah Rukh Khan Jawan Leaked Online Leaked In HD Quality : बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. एकीकडे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर दुसरीकडे रिलीज होताच हा सिनेमा ऑनलाईन लीक (Jawan Leaked Online) झाला आहे.
'जवान' रिलीज होताच शाहरुखला मोठा फटका
मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान (Shah Rukh Khan), नयनतारा आणि विजय सेतुपती यांचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा रिलीजच्या पहिल्याच दिवशी ऑनलाईन लीक झाला आहे. तमिळरॉकर्स, एमपी4मूवीज, पागलवर्ल्ड, वेगामूवीज आणि फिल्मीजिलसह वेगवेगळ्या साईटवर 'जवान' हा सिनेमा ऑनलाईक लीक झाला आहे. या सर्व साइटवर 'जवान' हा सिनेमा HD प्रींटमध्ये उपलब्ध आहे.
शाहरुखच्या 'जवान'चा अॅडव्हान्स बुकिंगमध्ये धमाका (Shah Rukh Khan Jawan Advance Booking)
'जवान' लीक झाल्यामुळे शाहरुखसह निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. पण अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहून निर्माते खूश झाले आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'जवान' या सिनेमाने 17 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'जवान' हा सिनेमा धमाका करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. 'जवान' हा सिनेमा भारतातील तब्बल 5500 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. तर जगभरात हा सिनेमा 10000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.
View this post on Instagram
शाहरुख खानचा मोठा चाहतावर्ग असून जगभरात त्याच्या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. 'जवान' या सिनेमात शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची झलकही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. एटली कुमारने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
300 कोटींच्या बजेटमध्ये 'जवान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शाहरुख खानने सांभाळली आहे. या सिनेमासाठी अभिनेत्याने 100 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. रिलीजआधी मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये 'जवान' या सिनेमाचं एक विशेष स्क्रिनिंग आयोजित करम्यात आलं होतं. सोशल मीडियावरही शाहरुखच्या 'जवान'ची जबरदस्त क्रेझ आहे.
संबंधित बातम्या
Shah Rukh Khan : थिएटरमध्ये जल्लोष, थर रचत गोविंदांची सिनेमाला सलामी.. शाहरुखच्या 'Jawan'चा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल; चाहते म्हणाले...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)