एक्स्प्लोर
अभिनेता शाहरुख खानला कोर्टाची नोटीस
"मी तपासणीचा अहवाल न्यायालयातही सादर केला आहे. न्यायालयाने शाहरुख खान, मध्यप्रदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे नियंत्रक, एका स्थानिक दुकानाचे मालिक आणि शेव्हिंग क्रीम कंपनीचे मालकांना नोटिस जारी केली आहे.
भोपाळ : शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीमुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला भोपाळच्या स्थानिक न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना विशेष न्यायाधीश काशीनाथ सिंह यांनी सोमवारी शाहरुख खानसह चार जणांना नोटीस जारी केली आहे. या सगळ्यांना 26 ऑगस्टला न्यायालयात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
राजकुमार पांडे नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. "शाहरुख खानने एका शेव्हिंग क्रीमची जाहिरात केली आहे. ही देशाची एक नंबर क्रीम असल्याचं सांगत या जाहिरातीद्वारे शाहरुख लोकांची दिशाभूल करत आहे," असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
"ही क्रीम लावल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर पुरळ आले. सरकारी रुग्णालयात त्यावर उपचार केले. ही क्रीम मध्यप्रदेश अन्न आणि औषध विभागाकडे तपासणीसाठी पाठवली. तपासणीत ही क्रीम वाईट दर्जाची असल्याचं समोर आलं," असंही राजकुमार पांडे यांनी याचिकेत सांगितलं.
राजकुमार पांडे म्हणाले की, "मी तपासणीचा अहवाल न्यायालयातही सादर केला आहे. न्यायालयाने शाहरुख खान, मध्यप्रदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे नियंत्रक, एका स्थानिक दुकानाचे मालिक आणि शेव्हिंग क्रीम कंपनीचे मालकांना नोटिस जारी केली आहे."
दरम्यान, शाहरुख सध्या 'हॅरी मेट सेजल' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा 4 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement