एक्स्प्लोर
सनी लिओनीसोबत कॉमेंट्री करायला वीरेंद्र सेहवाग तयार
मुंबई : आयपीएलच्या दहाव्या पर्वातील आजचा सामना अतिशय रंगतदार होणार आहे. कारण दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात दिल्ली डेअर डेव्हील्स आणि हैदराबाद सन रायझर्स संघात लढत होणार आहे. तर दुसरीकडे याच सामन्यादरम्यान आणखी एक सामना रंगणार आहे. आणि तो ही बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागमध्ये.
सनी लिओनीला कॉमेंट्रीसाठी एका सहकारीची गरज होती. यासाठी तिने आपल्या चाहत्यांना ट्वीटरद्वारे पर्याय सुचवण्यास सांगितलं होतं. तिच्या या ट्वीटनंतर वीरेंद्र सहेवागने ट्वीट करुन तिच्या सोबत कॉमेंट्र करण्याची तयारी दर्शवली आहे.
सनीने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन व्हिडीओ पोस्ट करुन म्हणलं आहे की, ''हॅलो मित्रांनो..., मी 2 मे रोजी कॉमेंट्रेटर म्हणून तुमच्या भेटीला येत आहे. पण सध्या मी कॉमेंट्रीसाठी एका क्रिकेटपटूच्या शोधात आहे... तुम्ही मला यासाठी मदत करु शकता का?''
सनीच्या या ट्वीटला वीरेंद्र सेहवागनेही आपल्या हटके स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. वीरु म्हणतो की, ''कॉमेंट्री आणि ती ही सनी सोबत... अतिशय विनोदी असेल... मी यासाठी तयार आहे...तुम्हीपण तयार राहा... मोठा धमाका होईल... बरोबर ना?''Hi guys,I'm looking for a cricket legend as partner for my next #MasalaCommentary on @UCNews_India .Any suggestions? https://t.co/GVdEtaX2ur
— Sunny Leone (@SunnyLeone) April 30, 2017
Hmm..commentary is going to be really Funny with Sunny. I am ready, aap bhi taiyaar ho jao! Dhamaka ho jayega, kyun? :_) https://t.co/SxMSleWQKP — Virender Sehwag (@virendersehwag) April 30, 2017दरम्यान, आयपीएल सामन्यावेळी बॉलिवूड सेलिब्रेटींच्या कॉमेंट्रीचा नवा फॉर्म्युला चांगलाच हिट होत आहे. यापूर्वी सनीने विनोदवीर सुनील ग्रोव्हरसोबतही कॉमेंट्री केली होती. शिवाय अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी देखील क्रिकेटसाठी कॉमेंट्री करुन, आपलं क्रिकेटप्रेम व्यक्त केलं होतं. आता सनीही आजच्या सामन्यादरम्यान, कॉमेंट्री करुन आपलं क्रिकेटप्रेम व्यक्त करणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement