Sarsenapati Hambirrao : प्रविण तरडेंच्या 'सरसेनापती हंबीरराव'ची 'बाहुबली'ला उत्सुकता; प्रभासने केला टीझर शेअर
Sarsenapati Hambirrao : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने 'सरसेनापती हंबीरराव' सिनेमाचा टीझर शेअर केला आहे.
Sarsenapati Hambirrao : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने 'सरसेनापती हंबीरराव' या मराठी सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. भव्य दिव्य ऐतिहासिक सेट, चफकल संवाद आणि लक्षवेधी अॅक्शन सिक्वेन्स असलेल्या अभिनेता प्रविण तरडे दिग्दर्शित 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटाच्या टीझरची सगळीकडेच चर्चा आहे. 'बाहुबली' फेम साऊथ स्टार प्रभास याला देखील या चित्रपटाची उत्सुकता असून आज त्याने आपल्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवरून या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हीने देखील या सिनेमाचा टीझर शेअर करत दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सिनेमाची उत्कंठा अधिकच वाढली आहे. छत्रपती शिवाजी महारज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्य गाथा 'सरसेनापती हंबीरराव' या बीगबजेट मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मिडियावर लॉंच करण्यात आला. या टीझरला 2 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
View this post on Instagram
या टीझर मधील चित्रपटाची भव्यता, संवाद आणि अॅक्शन सिक्वेन्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या 'मुळशी पॅटर्न' चित्रपटानंतर लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे हे भव्य दिव्य असा 'सरसेनापती हंबीरराव' हा ऐतिहासिक चित्रपट घेवून आले आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांनी केले आहे. तसेच सरसेनापती हंबीरराव यांची मुख्य भूमिकाही अभिनेते प्रविण तरडे साकारणार आहेत.