एक्स्प्लोर
"तू मुस्लिम आहेस की हिंदू?" गणपतीला वंदन करण्यावरुन सारा अली खान ट्रोल
सारा अली खाननं गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपतीला वंदन करतानाचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला, त्या फोटोवरुन तिला ट्रोल करण्यात आलं.
मुंबई: "तू एका मुस्लिम पिता आणि हिंदू स्त्रीची अपवित्र संतान आहेस", "तू इस्लामला लाज आणलीयेस", "तुझ्या नावातून इस्लामी नाव काढून टाक", "तू मुस्लिम आहेस, दगडांची पूजा करु नकोस". ही आहेत सारा अली खानला बहाल करण्यात आलेली विशेषणं! खरं तर याहीपेक्षा खालच्या पातळीची भाषा ट्रोलर्सनी वापरली आहे. सारा अली खानने गणपती मूर्तीपाशी वंदन करतानाचा एका फोटो काय शेअर केला, काही लोकांच्या पोटात मुरडाच आला.
त्याचं झालं असं की सारा अली खाननं गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपतीला वंदन करतानाचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. झालं! धर्मकडव्यांना एकदम चेव चढला. त्यांनी साराची इस्लामवरुन नुसती शाळाच घेतली नाही तर तिचा वाट्टेल त्या शब्दात उद्धार केला.
अर्थात, धार्मिकता आणि धर्मांधतेच्या धूसर होत जाण्याच्या काळात सारावरचे हे हल्ले काही अपवाद नाहीत. तिच्या आधीही नुसरत जहाँ, हिना खान, मंदना करिमी या सेलिब्रिटी कधी कपड्यांवरुन तर कधी वागण्यावरुन ट्रोल झाल्या आहेत. तिच्या वडिलांचा धर्म इस्लाम असल्यानं तीसुद्धा मुसलमान असल्याची सोयीस्कर समजूत करुन घेणं आणि एक प्रौढ सुशिक्षित तरुणी म्हणून तिच्या धर्मस्वातंत्र्याचा आदर करणं हा फरक मात्र कोणीच लक्षात घेतला नाही. काहींनी तर सारा अलीला ट्रोल करणाऱ्यांना जाब विचारताना. "आपल्या घरी दरवर्षी गणपती बसवणाऱ्या सलमानला का नाही ट्रोल करत?" असे अकलेचे तारेही तोडलेत.
मात्र, साराच्या बऱ्याच फॉलोअर्सनी तीची भक्कम पाठराखणही केलीये. तिच्या गणेश वंदनेमुळे भारताच्या बहुरंगी धार्मिक जीवनाची ओळख तिने जगाला करुन दिल्याच्या भावनाही सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
कोल्हापूर
सोलापूर
Advertisement