एक्स्प्लोर

Samrat Prithviraj Controversy : ‘सम्राट पृथ्वीराज’वर टीकेची झोड, कारण देताना दिग्दर्शक म्हणतात ‘मी स्वतः...’

Samrat Prithviraj : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Samrat Prithviraj Controversy : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) देखील झळकली आहे. अनेक चर्चा आणि जोरदार प्रमोशननंतरही हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे वळवण्यात काहीसा अपयशी ठरला आहे. शिवाय चित्रपटात दाखवलेल्या इतिहासामुळे त्याला ट्रोलही करण्यात येत आहे. चित्रपटाच्या विविध पैलूंमुळे चित्रपटावर बरीच टीका होत आहे. यावर आता चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी (Chandraprakash Dwivedi ) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘पृथ्वीराज रासों’वर आधारित सर्व पुस्तकांचा हवाला देत चित्रपटाच्या विविध मुद्द्यांवर होत असलेल्या टीका त्यांनी नाकारल्या आहेत. चित्रपटात हिंदी/संस्कृत शब्दांच्या वापरापेक्षा अधिक उर्दू/फारसी शब्दांचा वापर केल्यामुळेही चित्रपटावर टीकेची झोड उठली आहे. यावर बोलताना दिग्दर्शक म्हणाले की, उर्दू, पर्शियन, तुर्किक आणि अरबी हे शब्द शतकानुशतके आपल्या दैनंदिन जीवनात वापरले जातात, याची अनेक उदाहरणे दिली. हे शब्द सहज वापरले जात आहेत, जे लोकांनी स्वीकारले आहेत.

‘मी स्वतः इतिहासकार नाही..’

इतिहासकारांच्या मते, सम्राट पृथ्वीराज 1192 मध्ये आणि मोहम्मद घोरी 1206 मध्ये मरण पावले. पण, आधीच मरण पावलेले पृथ्वीराज रासो 14 वर्षांनंतर एका लढाईत मोहम्मद घोरीला कसे मारतात, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. यावर दिग्दर्शक द्विवेदी म्हणतात की, या युद्धाचा आणि घटनेचा उल्लेख संदर्भित पुस्तकांमध्ये आहे. मी काही स्वत: इतिहासकार नाही.

चित्रपट तयार करताना केला अनेक अडचणींचा सामना

डॉ. द्विवेदी यांनी चित्रपटावर होणाऱ्या इतर टीकेवरही वक्तव्य केले. यावेळी चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी शूटिंगमधील अडचणींबद्दलही सांगितले. युद्धाच्या दृश्यांच्या चित्रीकरणापासून ते शूटिंगमध्ये सामील असलेल्या शेकडो लोकांचे व्यवस्थापन करण्यापर्यंत, या सगळ्यात त्यांची किती तारेवरची कसरत होती, याविषयी देखील ते बोलले. मुघल वास्तुकला व्यतिरिक्त, भारतीय वास्तुकलेशी संबंधित सेट लावणे आणि ते पडद्यावर सादर करणे हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते, असे ते म्हणाले.

दिग्दर्शकाने मानले सर्वांचे आभार

चित्रपटाला मिळालेल्या प्रेमाबद्दल दिग्दर्शकाने सर्वांचे आभार मानले आणि निर्माता आदित्य चोप्रा यांनी चित्रपटासाठी केलेल्या कौतुकाचा विशेष उल्लेख केला. तीन राज्यांमध्ये चित्रपट करमुक्त झाला आहे. चित्रपटाचा व्यवसाय सर्वसाधारणपणे फायदेशीर असल्याने आणि चित्रपटाला सर्वसामान्यांची पसंती मिळाल्याबद्दल दिग्दर्शकाने आनंद व्यक्त केला.

हेही वाचा :

Aathva Rang Premacha : 'आठवा रंग प्रेमाचा' सिनेमातील रिंकू राजगुरुचा लूक रिव्हील; ट्रेलर आऊट

Vikram Box Office Collection : कमल हासनच्या 'विक्रम'चा महाविक्रम; तीन दिवसांत केली 160 कोटींची कमाई

KK Last Song : 'धूप पानी बहने दे' केके यांचं शेवटचं गाणं रिलीज; चाहते झाले भावूक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget