Samir Choughule : महाराष्ट्राचे लाडके हास्य महारथी समीर चौघुले! लोचन मजनूच्या माध्यमातून महाराष्ट्राला हासवणाऱ्या जत्रेकरीबद्दल जाणून घ्या
Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर समीर चौघुले घराघरांत पोहोचला आहे.
Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर समीर चौघुले (Samir Choughule) घराघरांत पोहोचला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील सर्वच जत्रेकरी एकापेक्षा एक आहेत. प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असून परफॉर्मन्स स्टाइल आहे. प्रत्येकाचा ह्युमर वेगळा आहे. पण समीर चौघुले प्रकरण जरा वेगळचं आहे. त्याने साकारलेला लोचन मजनू प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. लोचन मजनूच्या माध्यमातून तो महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून घराघरांत पोहेचलेला विनोदवीर समीर चौघुले
समीर चौघुले मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मराठीसह हिंदीतही त्याने काम केलं आहे. मराठी-हिंदी सिनेमांत समीर चौघुलेच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे. खरंतर विनोदवीर ही पदवी खूप कमी कलाकारांना बहाल केली जाते. लोकांना रडवण्यापेक्षा हसवणं खूप कठीण आहे, असं म्हटलं जातं. पण समीर चौघुले मात्र लोकांना हसवण्यात आणि त्यांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य आणण्यात अग्रेसर आहे. त्यामुळे समीर चौघुले मराठी मनोरंजनसृष्टीतील विनोदाचं खणखणीत नाणं आहे.
समीर चौघुलेबद्दल जाणून घ्या... (Who is Samir Choughule)
समीर चौघुलेचा जन्म 29 जून 1973 रोजी झाला आहे. विनोदवीर असण्यासोबत तो अनेक उत्कृष्ट अभिनेता आणि लेखक आहे. अष्टपैलू अभिनेता असला तरी विनोदी भूमिकांसाठी तो जास्त ओळखला जातो. त्याचं विनोदाचं टायमिंग खूपच कमाल आहे. अनेक मालिकांमध्ये समीर चौघुलेने काम केलं आहे. सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
समीर चौघुलेचा सिनेप्रवास... (Samir Choughule Movies)
समीर चौघुलेने 'कायद्याचं बोला', 'मुंबई मेरी जान', 'आजचा दिवस माझा', 'वक्रतुंड महाकाय', 'अ पेयिंग घोस्ट', 'मुंबई टाइम्स' आणि 'विकून टाक' या सिनेमांत काम केलं आहे. तसेच 'तिलक ते पोलिटिकल', 'आंबट गोड' आणि 'सारे तुझ्याचसाठी' या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये समीर चौघुलेने काम केलं आहे.
समीर चौघुलेच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. समीर आज अभिनेता, विनोदवीर म्हणून घराघरांत लोकप्रिय असला तरी त्याला कधीच अभिनयक्षेत्रात यायचं नव्हतं. तर क्रीडा क्षेत्रात त्याला आपलं करिअर करायचं होतं. शाळेत असताना तो खो-खो, कबड्डी या आंतरशालेय स्पर्धांचा कॅप्टन होता".
रंगभूमीवरचा पहिला प्रवेश अन् डायलॉगचं विसरलेला समीर चौघुले...
समीर चौघुलेने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्याच्या पहिल्या नाटकाबद्दल भाष्य केलं होतं. समीर म्हणालेला,"पहिलं नाटक अर्थात माझ्यासाठी खूप स्पेशल होतं. पण या नाटकाच्या पहिल्या प्रयोगादरम्यान मी रंगभूमीवर एन्ट्री घेतली आणि प्रेक्षकांना पाहिल्यानंतर संवादच विसरलो होतो. प्रेक्षकांना पाहून थरथर कापत होतो. त्यावेळी विंगेतून सरांनी मला डायलॉग सांगितले. पण हा प्रयोग पाहिल्यानंतर मला रडू कोसळलं होतं. एकंदरीतच पहिल्या प्रयोगाचा अनुभव खूपच वाईट होता".
संबंधित बातम्या