Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूने पूर्ण केले टायगर श्रॉफचे आव्हान
समंथा रुथ प्रभूने ( Samantha Ruth Prabhu) टायगर श्रॉफचे चॅलेंज पूर्ण केले आहे.
![Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूने पूर्ण केले टायगर श्रॉफचे आव्हान samantha ruth prabhu completes tiger shroff attack challenge now actress nominates arjun kapoor Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूने पूर्ण केले टायगर श्रॉफचे आव्हान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/29/8c3080322f807a809d8bcae81821b4f0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही फिटनेस फ्रीक अभिनेत्रा आहे. ती अनेकदा आपल्या फिटनेची झलक दाखवत असते. तिचे वर्कआउट व्हिडीओ अनेकांना प्रेरित करतात. समंथाने आता पुन्हा एकदा तिच्या त्याच फिटनेस रुटीनची झलक दाखवली आहे.
समंथाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती हेवी वर्कआउट करताना दिसत आहे. समंथाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना फिटनेसची आवड निर्माण होत आहे. हा एक चॅलेंज व्हिडीओ आहे, जो समांथाने पूर्ण केला आहे. अलीकडेच टायगर श्रॉफने अॅटॅक चॅलेंजसाठी समंथाला नॉमिनेट केले होते. ते चॅलेंज समंथाने पूर्ण केले आणि अभिनेता अर्जुन कपूरला नॉमिनेट केले.
View this post on Instagram
समंथाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर कराताना लिहिले आहे की, "मला आव्हान दिल्याबद्दल टायगर श्रॉफचे आभार, मी करून दाखवले. यासोबतच तिने अर्जुन कपूरला नॉमिनेट केले आहे.
रकुल प्रीत सिंहने हे अटॅक चॅलेंज सुरू केले आहे. तिचा 'अटॅक' हा चित्रपट 1 एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटात जॉन अब्राहमही सुपर सोल्जरच्या भूमिकेत दिसणार आहे. रकुल व्यतिरिक्त या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस देखील आहे. अटॅक चॅलेंज हा चित्रपटाच्या प्रमोशनचाच एक भाग होता. ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी उत्साहाने भाग घेत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर सक्रिय असलेली समंथा सध्या यशोदा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट यावर्षी रिलीज होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)