Daulat Maharaj Satpute Death Jalna News: देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव येथील दौलत बाबा यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ वाढत चालले आहे.

Daulat Maharaj Satpute Death Jalna News: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव येथील पाताळेश्वर संस्थानचे मठाधिपती बालयोगी देवेंद्र चैतन्य स्वामी उर्फ दौलत बाबा (Daulat Maharaj Satpute Death) यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ वाढत चालले आहे. रविवारी सकाळी स्वामींचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
दरम्यान, घटनेनंतर गायब झालेला स्वामींचा मोबाईल पोलिसांनी शोधून काढला आहे. घटनास्थळापासून सुमारे 40 फूट अंतरावर असलेल्या बारवेतून पाणी उपसून पोलिसांनी हा मोबाइल बाहेर काढला. पाण्यात पडल्यामुळे मोबाइल सध्या बंद असून, त्याची सीडीआर तपासणी केली जाणार आहे. स्वामींना शेवटचे फोन कुणाचे आले होते, त्यांचे कुणाशी संभाषण झाले होते, याची माहिती पोलिसांकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे मोबाइलमधील माहिती आणि संपर्कातील व्यक्तींच्या चौकशीतून या मृत्यूचे गूढ उकलणार का, याकडे लक्ष लागले आहे.
नेमकं प्रकरण काय? (Daulat Maharaj Satpute Death Jalna News)
जालना जिल्ह्यातील सावंगी अवघडराव येथील पुरातन पाताळेश्वर मंदिराचे मठाधिपती आणि कीर्तनकार देवेंद्र चैतन्य स्वामी उर्फ दौलत महाराज सातपुते यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. 14 नोव्हेंबरच्या रात्री गावात कीर्तन करून परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी (15 नोव्हेंबर) सकाळी दौलत महाराज सातपुते मृत अवस्थेत आढळले. पारध पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर त्यांच्या मठाजवळच त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. दौलत महाराज सातपुते हे मूळ नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातले असून मागील आठ ते दहा वर्षापासून भोकरदन तालुक्यातील अवघडराव सांगवी गावातल्या पाताळेश्वर मंदिराच्या मठामध्ये ते वास्तव्यास होते, पंचक्रोशी धार्मिक किर्तन आणि समाज प्रबोधनाचे ते काम करत होते.
कोण होते ह.भ.प. दौलत महाराज सातपुते? (Who was Daulat Maharaj Satpute?)
ह.भ.प. दौलत महाराज सातपुते (वय 41) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधक होते. ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील राहणारे होते. गेल्या 8 ते 10 वर्षांपासून दौलत महाराज सातपुते जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील पाताळेश्वर मंदिर परिसरातील मठात राहत होते. दौलत महाराज सातपुते तिथे कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक प्रबोधन करत होते. 14 नोव्हेंबरच्या रात्री गावात कीर्तन करून परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी (15 नोव्हेंबर) सकाळी दौलत महाराज सातपुते मृत अवस्थेत आढळले. पारध पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:





















