एक्स्प्लोर

Singer Rimi Tomy Second Marriage: प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा

Rimi Tomy Gets Married: लोकप्रिय गायिका पुन्हा अडकली लग्नबंधनात; फिटनेस ट्रेनरशी केलं दुसरं लग्न

Rimi Tomy Second Marriage: म्यूझिक इंडस्ट्रीतून (Music Industry) एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पार्श्वगायिका आणि टेलिव्हिजन पर्सनॅलिटी  रिमी टॉमी (Rimi Tomy) हिचं नुकतंच लग्न झालं आहे. गायिकेचं हे दुसरं लग्न असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिमी टॉमीने मुंबईस्थित मल्याळी बॉडीबिल्डर (Fitness Trainer) आणि फिटनेस ट्रेनर लिबिन मॅथ्यू याच्याशी लग्न केलं आहे. तिनं लग्न करुन आपल्या वैयक्तिक आयुष्याला अन् नव्या पर्वाला सुरुवात केली आहे.  हा विवाहसोहळा 14 नोव्हेंबर रोजी मुंबईतील डोंबिवली (Dombivali) येथे पार पडला. या विवाहसोहळ्यात जवळचे कुटुंब आणि नातेवाईंकांची उपस्थिती पाहायला मिळाली. तिच्या लग्नातील फोटोस सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.  

पार्श्वगायिका रिमी टॉमी हिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली (Rimi Tomy Gets Married for the Second Time)

रिमी टॉमी हिने याआधी तिच्या यूट्यूब चॅनेलवरील एका व्हिडीओद्वारे तिच्या लग्नाची घोषणा केली होती. या व्हिडीओत तिने लिबिनसोबतच्या तिच्या नात्याबद्दल आणि त्यांच्या लग्नाच्या तयारीबद्दल सांगितले होते. लग्नासाठी मुंबईची निवड का केली? याचं उत्तर देताना सिंगर म्हणाली की, 'मी महिन्यातून एकदा किंवा दोनदा मुंबईत जात असते. पण यावेळी मुंबईच जाणं थोडं खास आहे.  मी माझ्यासाठी लग्नासाठी मुंबईत जात आहे.  लिबिनचा जन्म आण वाढ मुंबईच्या डोंबिवलीत झाले आहे. याच कारणामुळे आम्ही लग्न तिथेच आयोजित करायचे ठरवले', असं  गायिका रिमी टॉमी म्हणाली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला.

लिबिनच्या पार्श्वभूमीबद्दल बोलताना रिमी म्हणाली की, 'लिबिन मल्याळी जरी असला तरी,  त्याची वाढ मुंबईत झाली आहे.   माझ्यासोबत ओळख झाल्यानंतर त्यानंतर त्याने मल्याळम बोलायला सुरुवात केली', असं रिमी टॉमी म्हणाली. रिमी टॉमी यांचा हा विवाहसोहळा अगदी खासगी पद्धतीने पार पडला.  या विवाहसोहळ्यात तिची आई,  भावंडे  कुटुंबातील काही सदस्य उपस्थित होते.   माहितीनुसार, बिझनेसमन  Royce Kizhakoodan याच्यासोबत काडीमोड घेतल्यानंतर  तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याने 27 एप्रिल 2008 रोजी लग्न केले होते. तेव्हा रिमी टॉमी 24 वर्षांची होती.  लग्नाच्या 11 वर्षांनंतर परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.  रिमी टॉमी हिने आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात 2002 पासून केली.  मल्याळम सिनेमातून पार्श्वगायनात पदार्पण केले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Sayali Sanjeev: सायली संजीव आपल्या नावापुढे बाबांचं नाव का लावते? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली 'आडनाव न लावता...'

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar On Ramayana: डिलिमेटशनच्या मुद्द्यावरुन 'महाभारत' घडत असताना रोहित पवार 'रामायण' चित्रपट पाहायला गेले, बाहेर पडताच सूचक पोस्ट, म्हणाले...
डिलिमेटशनच्या मुद्द्यावरुन 'महाभारत' घडत असताना रोहित पवार 'रामायण' चित्रपट पाहायला गेले, बाहेर पडताच सूचक पोस्ट, म्हणाले...
Mrs. Mukhyamantri Kidnap : ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ चित्रपटाची घोषणा...भाग्यश्री मोटे साकारणार महत्त्वाची भूमिका
‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ चित्रपटाची घोषणा...भाग्यश्री मोटे साकारणार महत्त्वाची भूमिका
Dhadkan 2 : 26 वर्षांनंतर 'धडकन'चा सिक्वेल येणार? अक्षय कुमार-शिल्पा शेट्टीचा पत्ता कट, सुनील शेट्टीच्या एन्ट्रीबाबत मोठी अपडेट
26 वर्षांनंतर 'धडकन'चा सिक्वेल येणार? अक्षय कुमार-शिल्पा शेट्टीचा पत्ता कट, सुनील शेट्टीच्या एन्ट्रीबाबत मोठी अपडेट
Rito Riba : इंडियन आयडॉलमध्ये नाकारलं, पण आज संपूर्ण देशाला वेड लावलं! 'दिलरुबा दिलनशीं' गाणारा रितो रिबा आहे तरी कोण?
इंडियन आयडॉलमध्ये नाकारलं, पण आज संपूर्ण देशाला वेड लावलं! 'दिलरुबा दिलनशीं' गाणारा रितो रिबा आहे तरी कोण?
Advertisement

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Residential Encroachments on Govt Land: फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Sharad Pawar NCP on Delimitation : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत जायचं ठरलं, रोहित पवारांच्या कट्टर समर्थकाची सूचक पोस्ट, चर्चांना उधाण
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत जायचं ठरलं, रोहित पवारांच्या कट्टर समर्थकाची सूचक पोस्ट, चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP on Delimitation : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
Embed widget