(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salman Khan : 'Being Strong' म्हणत केली सुरुवात, घरावर झालेल्या गोळीबारानंतर भाईजानची पोस्ट चर्चेत
Salman Khan Social Media Post : रविवारी सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर एक पोस्ट केलीये. ती पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे.
Salman Khan Social Media Post : बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर 14 एप्रिल रोजी सकाळी गोळीबार झाला. त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी निवासस्थानी हा गोळीबार करण्यात आला. पहाटे 4 वाजून 55 मिनिटांनी अज्ञातांकडून जो गोळीबार करण्यात आला त्यामधील एक गोळी सलमानच्या घरात देखील घुसल्याचं सांगण्यात येत होतं. पण या घटनेनंतर सलमानने स्वत:ला अजिबात निराश न केल्याचं पाहायला मिळतंय. कारण नुकतच सलमानने त्याच्या एका नव्या फिटनेस ब्रँडच्या लॉन्चची घोषणा केली आहे.
सोमवारी सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने त्याचा ब्रँड बिंग स्ट्राँगविषयी सांगितलं आहे. तसेच त्याचा हा ब्रँड दुबईत उपलब्ध होणार असल्याचं देखील सलमानने यावेळी सांगितलं आहे. सलमानच्या या व्हिडिओवर त्याच्या चाहत्यांनी देखील कमेंट्स करत त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सलमान खानच्या या व्हिडिओची बरीच चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानची पहिली पोस्ट
दरम्यान, रविवारी, 14 एप्रिल रोजी घराबाहेर गोळीबाराची घटना घडली असतानाही सलमान खानने आपले काम सुरू ठेवण्याचा आणि आपल्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. अहवालांनुसार, या सगळ्या घटनांमध्ये जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्याकडे तो अजिबात लक्ष देऊ इच्छित नाही त्याचप्रमाणे हल्ल्यानंतरही सलमान त्याचं काम सुरुच ठेवणार आहे. इंडिया टुडेला दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खान हे त्याचे शेड्युल्ड शूट करत राहणार आहेत. त्याचप्रमाणे तो त्याचे घर बदलणार असल्याच्या अफवा असल्याचंही यावेळी सांगण्यात येत आहे.
गोळीबाराचा संबंध बिश्नोई गँगशी
गोळीबाराचा लॉरेन बिश्नोई गँगशी (Bishnoi Gang) संबंध आहे. याआधी देखील बिश्नोई गँगकडून सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात काळविटांना देवासमान मानले जाते. 1998 मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच लॉरेन्सकडून सलमान खान धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता, घराजवळ गोळीबार झाला.