एक्स्प्लोर
आईसोबत सलमान खानचा खास व्हिडीओ
सलमान आपल्या बिझी शेड्यूलमधूनही आईसाठी वेळ देतो, हे या व्हिडीओतून दिसत आहे.
मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'भारत' सिनेमाचं माल्टा देशात चित्रीकरण करत आहे. या शूटिंगदरम्यान त्याने आई सलमा खानसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमानचं आईसोबतचं खास बॉण्डिंग दिसत आहे.
सलमान आपल्या आईला पायऱ्या चढण्यास मदत करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 'ये बंधन तो प्यार का बंधन है', असं कॅप्शन त्याने व्हिडीओ शेयर करताना दिलं आहे. हे गाणं सलमानचा सुपरहिट चित्रपट 'करण-अर्जुन'चं टायटल साँग आहे.
सलमान आपल्या बिझी शेड्यूलमधूनही आईसाठी वेळ देतो, हे या व्हिडीओतून दिसत आहे. याआधी काही दिवसांपूर्वी सलमानने आईसोबतचा फोटो शेअर करुन 'माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीसोबत', असं कॅप्शन दिलं होतं.Yeh bandhan toh .. pyaar ka bandhan hai #Bharat pic.twitter.com/5pM9eF93SE
— Salman Khan (@BeingSalmanKhan) August 20, 2018
दरम्यान, सलमानचा आगामी 'भारत' चित्रपट अली अब्बास जाफर दिग्दर्शित करणार आहे. सिनेमात सलमानशिवाय कतरीना कैफ, दिशा पटानी, तब्बू, सुनील ग्रोव्हर आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पुढील वर्षी ईदला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.With the love of my life pic.twitter.com/bHHSALxAE6
— Salman Khan (@BeingSalmanKhan) August 12, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement