एक्स्प्लोर

Salman Khan New Look : मोठे केस, रागीट अंदाज; सलमान खानच्या नव्या चित्रपटातील लूकची चर्चा

Salman Khan Start Shooting For His New Film : अभिनेता सलमान खानने त्याच्या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. सलमाने इंस्टाग्रामवर चित्रपटातील लूकची झलक शेअर केली आहे.

Salman Khan New Look From His Upcoming Film : बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानचा दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर नवीन चित्रपट प्रदर्शित होतो. मात्र यावर्षी 'भाईजान'चा नवा चित्रपट न आल्याने त्याचे चाहते काहीसे नाराज झाले होते. मात्र सलमान खानच्या चाहत्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे. सलमान खानने त्याच्या आगामी नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. सलमानने इंस्टाग्रामवर त्याच्या नव्या लूकचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 

सलमान खानने शेअर केलेल्या फोटोमध्ये सलमान खानचा नवा अंदाज पाहायला मिळत आहे. सलमानने इंस्टाग्रामवर चित्रीकरणा दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. सलमानचा हा नवा लूक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नव्या फोटोंमध्ये मोकळे केस, ब्लॅक टी-शर्ट, ब्लॅक जॅकेट, गॉगल चेहऱ्यावर राग आणि हातात लोखंडी रॉड असा सलमानचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे.

नव्या लूकवरून आगामी चित्रपटात सलमान खान जबरदस्त अॅक्शन करताना पाहायाला मिळणार असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, सलमानच्या आगामी चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. चित्रपटाच्या नावाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, मात्र हा चित्रपट बिग बजेट असल्याचं बोललं जात आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानचा नवा लूक पाहिल्यानंतर सलमान खानचे चाहते चित्रपटाच्या नावाची आणि स्टारकास्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान 2021 मध्ये 'अंतिम' चित्रपटात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही. आता सलमानचे चाहते त्याच्या दमदार भूमिकेसह नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

'कभी ईद, कभी दिवाळी' चित्रपटाव्यतिरिक्त सलमान खान 'टायगर 3' चित्रपटामध्येही दिसणार आहे. त्याचबरोबर शाहरुख खानच्या 'पठाण' आणि तेलगू चित्रपट 'गॉड फादर'मध्येही सलमान खान कॅमिओ भूमिकेत झळकणार आहे. 'गॉड फादर' हा सलमान खानचा तेलुगू डेब्यू चित्रपट आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
उद्धव ठाकरेच गद्दारीचे जनक, त्यांचा ढोंगीपणा उघड, मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल 
उद्धव ठाकरेच गद्दारीचे जनक, त्यांचा ढोंगीपणा उघड, मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल 
Dattatray Gade Arrested : इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
Video : अत्याचार पीडिता केस करण्यासाठी गेली, पोलिस अधिकारी म्हणतो 30 हजार दे मग केस घेतो, मग लाचलूचपतने पकडलं, गाडीत दाबून कोंबताच म्हणाला पैसे परत देतो की!
Video : अत्याचार पीडिता केस करण्यासाठी गेली, पोलिस अधिकारी म्हणतो 30 हजार दे मग केस घेतो, मग लाचलूचपतने पकडलं, गाडीत दाबून कोंबताच म्हणाला पैसे परत देतो की!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Commissioner Amitesh Kumar PC : नराधम दत्ता गाडे कसा सापडला? पुणे पोलिसांची UNCUT PCABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 28 February 2025Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखलABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00 AM 28 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
उद्धव ठाकरेच गद्दारीचे जनक, त्यांचा ढोंगीपणा उघड, मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल 
उद्धव ठाकरेच गद्दारीचे जनक, त्यांचा ढोंगीपणा उघड, मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल 
Dattatray Gade Arrested : इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
Video : अत्याचार पीडिता केस करण्यासाठी गेली, पोलिस अधिकारी म्हणतो 30 हजार दे मग केस घेतो, मग लाचलूचपतने पकडलं, गाडीत दाबून कोंबताच म्हणाला पैसे परत देतो की!
Video : अत्याचार पीडिता केस करण्यासाठी गेली, पोलिस अधिकारी म्हणतो 30 हजार दे मग केस घेतो, मग लाचलूचपतने पकडलं, गाडीत दाबून कोंबताच म्हणाला पैसे परत देतो की!
Heatwave In March : मार्चमध्ये भीषण गर्मीचा इशारा, तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता; काल दिल्लीत 74 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र, हिमाचल-जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
मार्चमध्ये भीषण गर्मीचा इशारा, तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता; काल दिल्लीत 74 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र, हिमाचल-जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
Ajit Pawar : स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीला बेड्या; पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीला बेड्या; पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विद्यापीठातील दोन समलैंगिक विद्यार्थी भाड्याच्या खोलीत नागरिकांना रंगेहाथ सापडले; तीन महिन्यांपासून जेलमध्ये, आता इस्लामिक कायद्यांतर्गत दोघांना...
विद्यापीठातील दोन समलैंगिक विद्यार्थी भाड्याच्या खोलीत नागरिकांना रंगेहाथ सापडले; तीन महिन्यांपासून जेलमध्ये, आता इस्लामिक कायद्यांतर्गत दोघांना...
Embed widget