एक्स्प्लोर

Chhava The Great Warrior : 'छत्रपती संभाजी महाराज' ग्रंथावर आधारित 'छावा-द ग्रेट वॉरिअर' सिनेमा लवकरच प्रदर्शित

Chhava : 'छावा-द ग्रेट वॉरिअर' या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे.

Chhava The Great Warrior : धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंती दिनीच्या पूर्वसंधेला त्यांच्यावरील चरित्रपट ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ (Chhava The Great Warrior) या सिनेमाची घोषणा झाली आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती संभाजी महाराज’ ग्रंथावर आधारित हा सिनेमा आहे. 

राहुल जाधव यांनी ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. संभाजी महाराजांच्या साहस आणि शौर्याची गाथा या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संभाजी महाराजांच्या तेजस्वी कारकिर्दीवरील मल्हार पिक्चर्स प्रस्तुत 'छावा-द ग्रेट वॉरिअर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'छावा-द ग्रेट वॉरिअर' या सिनेमाचे दिग्दर्शक राहुल जाधव म्हणाले, भूराजे खरे 'युथ आयकॉन' आहेत. वयाच्या नवव्या वर्षांपासून राजकारणाचे धडे घेत असलेल्या स्वराज्याच्या पहिल्या युवराजांची फक्त युद्धकौशल्यावरच नाही तर चौदा भाषांवर आणि साहित्यावरदेखील मजबूत पकड होती. कल्पनेतल्या सुपरहिरोंपेक्षा वास्तवातील सुपरहिरोवर सिनेमा बनवण्याची इच्छा होती. ती 'छावा-द ग्रेट वॉरिअर' या सिनेमाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. 

थोर इतिहासकार आणि कादंबरीकार लेखक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले,"असिम त्याग, पराकोटीची सहनशीलता, जाज्वल्य देशाभिमान आणि हौतात्म्याचे प्रतिक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. विविध विद्या, शास्त्रे आणि पुराणे यांचा गाढा व्यासंग असलेला हा मराठ्यांच्या छावा.  आजच्या पिढीला शंभुराज्यांच्या कर्त्तृत्वाची प्रचिती हा सिनेमा पाहिल्यावर येईल, असा मला विश्वास आहे". 

सिनेमाचे निर्माते सनी रजानी म्हणाले,"जगातील पहिल्या बुलेटप्रूफ जॅकेटचा शोध संभाजी महाराजांनी लावला, सर्वात पहिली जैविक लढाई शंभूराजांनी बुद्धीने लढली. मोगलांना वाकवणारा, इंग्रजांना नाचवणारा, पोर्तुगीजांना झुकवणारा, सीद्दीला दर्यात बुडवणारा, एकाही लढाईत न हरलेला शेवटच्या श्वासापर्यंत अजेय ठरलेला शंभुराजांसारखा छत्रपती स्वराज्याला लाभला हे आपलं भाग्य. आणि त्यांच्या संघर्षमयी आणि गतीमान आयुष्यावर चित्रपट निर्मिती करण्याचं भाग्य आम्हांला मिळालं आहे."

संभाजी महाराजांच्या तेजस्वी कारकिर्दीवरील मल्हार पिक्चर्स प्रस्तुत 'छावा-द ग्रेट वॉरियर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोशन पोस्टर रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
Marathi Actress Mrunal Dusanis: 'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...

व्हिडीओ

Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget