Salman Khan: सलमान खान अडकणार लग्नबेडीत? 'माझ्या काळजाचा तुकडा'; मिस्ट्री गर्लसोबत शेअर केला फोटो
Salman Khan: सलमान खानच्या लग्नाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत, अशातच भाईजानने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे या चर्चांना नव्याने उधाण आलं आहे. सलमान खानचे चाहते देखील आता संभ्रमात आले आहेत.
Salman Khan: सलमान खान लग्न कधी करणार याकडे चाहत्यांसह अनेकांचं लक्ष लागलं आहे. एकीकडे बॉलिवूडचे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. मात्र सलमान काही लग्नाचं नाव घेताना दिसत नाही. अशातच सलमान खानने (Salman Khan) इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमुळे त्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पोस्ट केलेल्या फोटोत सलमान खान एका मुलीसोबत दिसत आहे. त्याने या फोटोला रंजक कॅप्शन देखील दिलं आहे. या फोटोमागची कहाणी जाणून घेऊया.
'माझ्या काळजाचा तुकडा'
सोशल मीडियावर नुकताच सलमान खानने एका मुलीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. मात्र या फोटोत या मुलीचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे ही मुलगी नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न सलमानच्या चाहत्यांना देखील पडला आहे. या फोटोला त्याने "मी कायम तुझ्या पाठीशी असेन" असं कॅप्शन दिल्याने चाहते आणखी संभ्रमात पडले आहेत.
या फोटोत सलमान आणि ती मुलगी पांढऱ्या सुटमध्ये दिसत आहेत. त्यांनी महागडं जॅकेट घातलं आहे, ज्यावर ‘27/12’ही तारीख लिहिली आहे. ज्यावरुन चाहत्यांना सलमानच्या वाढदिवसाची आठवण आली. या फोटोवर "माझ्या काळजाचा तुकडा" असंही लिहीलं आहे. या फोटोला अवघ्या काही वेळात लाखो लाईक्स मिळाले आहेत.
सलमान खान अडकणार लग्नबंधनात?
सलमान खानच्या चाहत्यांनी संभ्रमात येऊन भाईजानच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांना असं वाटत आहे की, सलमान खान लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. तर काहींना सलमानचा आगामी चित्रपट 'टाईगर-3' शी या फोटोचा काही कनेक्शन असल्याचं वाटत आहे. तर काहींच्या मते, ही पाठमोरी मुलगी सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री (Alizeh Agnihotri) आहे.
अनेकदा सलमानचे असे फोटो व्हायरल होतात, ज्यामुळे सलमानच्या लग्नाबाबतच्या बातम्या समोर येतात. नुकताच सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता, ज्यात तो एका मिस्ट्रीगर्लसोबत दिसला होता. पण सलमानच्या लग्नाबद्दल अजूनपर्यंत काही वृत्त नाही.
View this post on Instagram
कोण आहे अलिझेह अग्निहोत्री?
बॉलीवूडशी संबंधित अभिनेत्री अलिझेह अग्निहोत्री ही एका उच्चभ्रू वंशातून आहे. तिचे वडील अतुल अग्निहोत्री हे अनुभवी अभिनेते आहेत, तर तिची आई अलविरा खान-अग्निहोत्री हिने चित्रपट निर्माती म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. सलमान खान हा अलविरा खानचा भाऊ आहे. अलिझेह अग्निहोत्री ही सलमानची भाची आहे.
हेही वाचा:
MS Dhoni Viral: धोनीचा साधेपणा! मुंबईच्या रस्त्यांवर बाईकस्वारी; व्हिडीओ व्हायरल