एक्स्प्लोर
सलमान खान मुंबई महापालिकेचा स्वच्छतादूत
मुंबई: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आता मुंबईकरांना स्वच्छतेचा संदेश देणार आहे. कारण मुंबई महापालिकेने सलमानची स्वच्छता अभियानाचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे सलमान मुंबई महापालिकेच्या स्वच्छता अभियानाचा चेहरा असेल.
सलमान खान या कॅम्पेनच्या माध्यमातून उघड्यावर मलविसर्जनाविरोधात आणि कचरा मुक्त शहरासाठी संदेश देणार आहे.
पालिकेकडून सलमान खानला पत्र पाठवण्यात आलं असून, सलमानच्या 'बिईंग ह्यूमन' फाऊंडेशननं हे निमंत्रण स्वीकारलं आहे. 'बिईंग ह्यूमनट फाऊंडेशनच्या माध्यमातून मोबाईल टॉयलेट उभारण्यासाठी सहाय्य करणार असल्याचंही म्हटलं आहे.
व्हिडीओ आणि रेडिओ जिंगल्सच्या माध्यमातूनही सलमानचा स्वच्छ मुंबईचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मुंबई पालिकेचा मानस आहे. सलमान खानची सोशल मीडियावरची लोकप्रियता, आणि त्याच्या चाहत्यांची संख्या पाहता ही मोहिम यशस्वी होईल असा विश्वास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement