(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salman Khan : Hum Aapke Hain Koun ते Bajrangi Bhaijaan; जाणून घ्या सलमान खानचे सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे
Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांत कमा केलं आहे.
Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हिंदी सिनेसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. आजवर त्याने एका पेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे तो चर्चेत आला आहे. आज सलमानच्या वाढदिवशी जाणून घ्या त्याच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांबद्दल
सलमान खानचे सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे (Salman Khan Top 10 Movies) :
हम आपके है कौन (Hum Aapke Hain Koun) :
'हम आपके है कौन' हा सिनेमा 1994 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कौटुंबिक सिनेमात सलमान खानसह माधुरी दीक्षित, मोहनीश बहल, आलोक नाथ, रेणुका शहाणे, रीमा लागू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. आजही हा सिनेमा चाहते सिनेप्रेक्षक आवडीने पाहतात.
बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijaan) :
सलमानचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कंबीर खानने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात सलमानसह करीना कपूर आणि नवादुद्दीन सिद्दीकीदेखील झळकले होते. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.
कुछ कुछ होता है (Kuch Kuch Hota Hai) :
'कुछ कुछ होता है' या मल्टीस्टार सिनेमाचं दिग्दर्शन करण जौहरने केलं होतं. शाहरुख खान, सलमान खान, रानी मुखर्जी, काजोल आणि अनुपम खेर अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती. हा सिनेमा 16 ऑक्टोबर 1998 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाला अनेक पुरस्कारदेखील मिळाले होते.
करण अर्जुन (Karan Arjun) :
'करण अर्जुन' हा सिनेमा 13 जानेवारी 1995 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. राकेश रोशनने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात शाहरुख खान, सलमान खान आणि राखी मुख्य भूमिकेत होते. या सिनेमामुळे शाहरुख आणि सलमानची जोडी चांगलीच गाजली.
दबंग (Dabangg) :
सलमानचा 2010 साली प्रदर्शित झालेला 'दबंग' हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. अभिनव कश्यपने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आतापर्यंत या सिनेमाचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
एक था टायगर (Ek Tha Tiger) :
'एक था टायगर' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2012 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कबीर खानने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते.
बॉडीगार्ड (Bodyguard) :
'बॉडीगार्ड' हा सिनेमा 2011 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एक हटके लव्हस्टोरी या सिनेमात पाहायला मिळाली. सलमान खान आणि करीना कपूर या सिनेमात मुख्य भूमिकेत होते.
हम दिल दे चुके सनम (Hum Dil De Chuke Sanam) :
'हम दिल दे चुके सनम' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संजय लीला भंसाळींनी सांभाळली होती. या सिनेमात सलमान खान, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत होते.
सुल्तान (Sultan) :
कुस्तीवर आधारित असलेल्या 'सुल्तान' या सिनेमात सलमान खान आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत झळकले होते. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.
तेरे नाम (Tere Naam) :
'तेरे नाम' या रोमॅंटिक सिनेमाचं दिग्दर्शन सतीश कौशीकने केलं होतं. या सिनेमात सलमान खान आणि भूमिका चावला मुख्य भूमिकेत होते. फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
संबंधित बातम्या