एक्स्प्लोर

Salman Khan House Firing Case : सलमानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी शस्त्राचं काय केलं? पोलीस तपासात समोर आली महत्त्वाची माहिती

Salman Khan House Firing Case :  सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी शस्त्रांचे काय केलं? याबाबतची महत्त्वाची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Salman Khan House Firing Case :  बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) राहत असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना 72 तासांच्या आत गुजरातमधील भूज येथून पोलिसांनी अटक केली. आरोपींनी गोळीबार केलेली एक गोळी सलमान खानच्या घरालाच्या भिंतीत घुसली. सलमान खानच्या घराजवळ गोळीबार झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवली. पोलिसांच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

फेब्रुवारी महिन्यात मुंबई गाठली, करारनाम्याशिवाय फ्लॅट भाड्यावर घेतला

आरोपींनी फेब्रुवारी महिन्यात मुंबई  गाठली असल्याची माहिती तपासात समोर आली. आरोपींनी मुंबई सेंट्रल येथील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि त्यानंतर त्यांनी सलमान खानच्या घराची म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी केली होती. त्यानंतर आरोपींनी पनवेल येथील हरिग्राम गावातील राधाकृष्ण सोसायटीत फ्लॅट भाड्याने घेतला.आरोपी रेकी करण्यासाठी पनवेलहून मुंबईत यायचे. आरोपींनी पनवेलमध्ये घर घेताना घराचा करारनामाही केला नव्हता. घर भाड्याने देण्यासाठी आरोपींनी 25 ते 30 हजार रुपयांचा सौदा केला होता. त्याशिवाय आरोपींनी 24 हजार रुपयांना दुचाकी खरेदी केली होती. आरोपीने दुचाकी खरेदी केली तरी त्याची पूर्ण रक्कमही दिली नसल्याचे दुचाकीच्या मालकाने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले. 

या प्रकरणात आरोपींना जरी अटक झाली असली तरी गुन्ह्यांत वापरण्यात आलेले शस्त्र पोलिसांना सापडलेलं नाही. मुंबई पोलिसांकडून याचा कसून तपास सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेलं हत्यार हे मुख्य पुरावा आहे. मात्र, ते अद्याप पोलिसांच्या हाती लागलेलं नाही. गुन्ह्यात वापरलेलं हत्यार हे बॅलेस्टिक रिपोर्टसाठी महत्वाचा पुरावा आहे. त्यामुळे हे शस्त्र हस्तग करण्यासाठी पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.

गोळीबार केल्यानंतर आरोपींनी शस्त्राचे काय केले?

सलमान खान प्रकरणात आरोपींच्या प्राथमिक चौकशीत गुन्ह्यातील हत्यार दोघांनी वांद्रेतच फेकल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र वांद्रेमध्ये हे शस्त्र नेमकं कुठे फेकलं याचा तपास पोलीस आता करत आहेत. या प्रकरणात सध्या या दोघां व्यतिरिक्त  तीन जणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यात ज्या व्यक्तीकडून आरोपींनी दुचाकी विकत घेतली ती व्यक्ती, ज्या घरात आरोपी भाड्याने रहात होते त्या घरमालकाशी आणि आरोपींना सिमकार्ड मिळवून देणाऱ्यांची चौकशी सध्या सुरू आहे. 

इतर संबंधित बातमी : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमन्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमन्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Ramayana : 'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPm Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल, योगी आदित्यनाथदेखील उपस्थित : ABP MajhaSunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होतीRam  kadam On Ghatkopar Hording  :  राम कदमांकडून भावेश भिडेंचा ठाकरेसोबतचा फोटो ट्विट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमन्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमन्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Ramayana : 'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
Aishwarya Divorce :  प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
South Movies : 'या' महिन्याच्या शेवटी   6 दाक्षिणात्य चित्रपट आमने-सामने; बॉलिवूडलाही बसणार फटका
'या' महिन्याच्या शेवटी 6 दाक्षिणात्य चित्रपट आमने-सामने; बॉलिवूडलाही बसणार फटका
Embed widget