सलमान खान-संजय लीला भन्साळी यांची जोडी तब्बल 19 वर्षांनी मोठ्या पडद्यावर
सलमान आणि संजय लीला भन्साळी यांनी 19 वर्षांपूर्वी हम दिल दे चुके सन या सिनेमात काम केलं होतं. हा सिनेमा ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या सिनेमात सलमानसोबत ऐश्वया राय आणि अजय देवगन मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर सलमान आणि भन्साळींची जोडी पडद्यावर कधी येणार याची त्यांचे प्रेक्षक वाट पाहत आहेत.
मुंबई : अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची जोडी तब्बत 19 वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहेत. 'हम दिल दे चुके सनम'नंतर सलमानला घेऊन संजय लीला भन्साळी 'बाजीराव मस्तानी' करणार होते, मात्र ते शक्य झालं नाही. पण आता एक वेगळी प्रेमकथा घेऊन हे दोघं आपल्या भेटीला येत आहेत.
या सिनेमाची स्क्रिप्ट फायनल झाली असून पटकथेवर काम सुरु असल्याचं समोर येत आहे. मात्र सिनेमाचं नाव आणि इतर माहिती अद्याप समोर आलेली नाही. संजय लीला भन्साळी यांच्या या सिनेमात सलमान असू शकतो, मात्र याची अद्याप घोषणा झालेली नाही. या सिनेमाचं शूटिंग 2019 च्या मध्यावधीत सुरु होणार असल्याचं निश्चित झालं आहे. तर 2020 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
सलमान आणि संजय लीला भन्साळी यांनी 19 वर्षांपूर्वी हम दिल दे चुके सन या सिनेमात काम केलं होतं. हा सिनेमा ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या सिनेमात सलमानसोबत ऐश्वया राय आणि अजय देवगन मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर सलमान आणि भन्साळींची जोडी पडद्यावर कधी येणार याची त्यांचे प्रेक्षक वाट पाहत आहेत.
पद्मावत, रामलीला आणि बाजीराव मस्तानी या सिनेमांनंतर प्रेक्षक आता सलमान आणि संजय लीला भन्साळी यांच्या या सिनेमाची वाट पाहत आहेत.