Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील मोठी अपडेट, आरोपी मोहम्मद शहजादला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Saif Ali Khan Accuse in Judicial Custody : सैफ अली खान हल्ला प्रकरणात आरोपीला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Saif Ali Khan Knife Attack : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिस कसून तपास करत असून दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहे. आरोपी मोहम्मद शहजाद याला 19 जानेवारीला अटक करण्यात आली होती, तेव्हापासून तो पोलिस कोठडीमध्ये आहे. आता त्याला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीवन कोठडी सुनावली आहे.
आरोपी मोहम्मद शहजादला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात हल्लेखोर मोहम्मद शहजाद याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बुधवारी बांद्रा कोर्टात आरोपीला हजर केले असता पोलिसांनी आरोपीची तीन दिवस तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून मागितलेली होती, मात्र बांद्रा कोर्टाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आरोपीच्या जामिनासाठी सेशन कोर्टात अर्ज करणार
आरोपीला न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर आता आरोपीच्या वकिलांकडून दोन ते तीन दिवसांमध्ये आरोपीच्या जामिनासाठी सेशन कोर्टात अपील करण्यात येणार आहे. सैफ अली खान प्रकरणात पोलिसांनी फेस रिकग्निशन आणि फिंगरप्रिंटचेरिपोर्ट अजूनपर्यंत कोर्टात सादर केलेले नाहीत. या सर्व गोष्टी ऐकल्याच्या नंतर कोर्टाने ही सुनावणी दिलेली आहे.
चोरीचा फोन वापरतोय आरोपी
आरोपी मोहम्मद शहजाद मे महिन्यात कोलकातामध्ये आला तेव्हा, तो काही दिवस फुटपाथवर राहत होता, अशी माहिती समोर आली आहे. त्या फुटपाथच्या शेजारी असलेल्या रुग्णालयात एका महिलेचा पती दाखल होता. आरोपीने या महिलेचा मोबाईल चोरला. पण ती गरीब आणि अशिक्षीत असल्यामुळे तिने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली नाही. आरोपीची त्या मोबाइलमधील सीमाकार्ड वापरत आहे, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाली आहे.
सैफ अली खानच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल
सैफ अली खानच्या घरी चोरी आणि हल्ल्याच्या घटनेनंतर, त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. सैफ आणि त्याची पत्नी करिना व्यतिरिक्त, घरातील सुरक्षा व्यवस्था देखील बदलण्यात आली आहे. सैफ अली खानच्या जुन्या घरात, फॉर्च्यून हाइट्स बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्येही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात येत आहे. सैफ अली खान पूर्वी फॉर्च्यून हाइट्समध्ये राहत होता आणि आता ते ऑफिस म्हणून वापरलं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :