सैफ हल्ल्यात मोहम्मद शहजादच खरा आरोपी, पोलिसांच्या हाती मोठा पुरावा; फेस रेकग्निशन अहवाल समोर
Saif Ali Khan Knife Attack : सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांच्या हाती आरोपीविरोधातील आणखी एक मोठा पुरावा लागला आहे.

Saif Ali Khan Attack Case : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी मोहम्मद शहजाद याचा फेस रेकग्निशन टेस्ट (Facial Recognition Test) म्हणजेच FRT अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादचा सीसीटिव्हीतील चेहरा यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आरोपींच्या वकिलांनीही त्यावर प्रश्न उपस्थित करत सीसीटिव्हीतील आरोपी मोहम्मद शहजाद नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता हा अहवाल समोर आल्यावर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.
आरोपीचा फेस रेकग्निशन अहवाल समोर
अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद शहजादला अटक केली. यानंतर पोलिस चौकशीत आपल्याला फसवलं जात असल्याचं आरोपी मोहम्मदने म्हटलं. आरोपीच्या कुटुंबियांनीही दावा केला की, सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती आणि पोलिसांनी पकडलेला व्यक्ती एक नसून आरोपी वेगळाच आहे. यामुळे आरोपीचा चेहरा आणि सीसीटीव्हीत पळताना दिसलेल्या चोराचा चेहरा यांचं फेस रेकग्निशन करण्यात आला. आता त्याचा अहवाल समोर आला असून सीसीटीव्हीमध्ये पळणार चोर मोहम्मद शहजाद असल्याचं स्पष्ट झालं आहे.
सैफ हल्ल्यातील आरोपीविरोधात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
16 जानेवारीच्या मध्यरात्री सैफ अली खानच्या घरात घुसून चोरट्याने त्याच्यावर जीवघेणा चाकूहल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 19 जानेवारी रोजी आरोपी मोहम्मद शहजादला अटक केली. आरोपीचं नाव शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर असल्याचं तपासात समोर आलं. इतकंच नाही, तर आरोपी बांगलादेशी नागरिक असून भारतात अवैधरित्या पोहोचल्याचं समोर आलं.
नेमकं काय घडलं?
सैफवर चाकूहल्ला केल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. आरोपी पायऱ्यांवरुन पळून जाताना त्याचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला, ज्याच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा तपास पुढे नेला आणि आरोपीला अटक केली. सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती शरीफुल आहे की नाही, असं अनेक प्रश्न उपस्थित झाले. काही लोकांनी तर असेही म्हटलं की, अटक केलेली व्यक्ती आणि सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती वेगळी आहे. अटक केलेल्या आरोपीच्या वडिलांनीही दावा केला की, त्यांच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात आहे.
आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
यानंतर, मुंबई पोलिसांनी आरोपीची फेशियल रेकग्निशन टेस्ट (FRT) करण्याचा निर्णय घेतला. आता एफआरटी अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. दरम्यान, आरोपी मोहम्मद शहजादला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला 11 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता पुढील तपासात आणखी काय माहिती समोर येत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Squid Game 3 : फायनल गेमसाठी तयार राहा... स्क्वीड गेमच्या तिसऱ्या सीझनची घोषणा, 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
