Sai Pallavi: "अफवांची पर्वा नाही पण जेव्हा त्यात मित्रांचा समावेश असतो तेव्हा..."; लग्नाच्या अफवांवर आणि व्हायरल फोटोवर साई पल्लवीनं सोडलं मौन
Sai Pallavi: राजकुमार पेरियासामी आणि सई पल्लवी या दोघांचा फोटो काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर साई आणि राजकुमार यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.
Sai Pallavi : दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या एका व्हायरल फोटोमुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी (Rajkumar Periasamy) आणि सई पल्लवी या दोघांचा फोटो काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघांनी गळ्यात फुलांचा हार घातलेला दिसला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर साई पल्लवी आणि राजकुमार यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. आता या व्हायरल फोटोबाबत आणि लग्नाच्या अफवांवर साई पल्लवीनं मौन सोडलं आहे.
साई पल्लवीचं ट्वीट
साई पल्लवीनं ट्विटरवर एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं, "प्रामाणिकपणे सांगते, मला अफवांची पर्वा नाही पण जेव्हा त्यात कुटुंबातील मित्रांचा समावेश असतो तेव्हा मला बोलायचे असते. माझ्या चित्रपटाच्या पूजा समारंभातील फोटो जाणूनबुजूने क्रॉप करण्यात आला आणि घृणास्पद हेतूने प्रसारित केली गेली."
"जेव्हा माझ्याकडे माझ्या कामाच्या आघाडीवर शेअर करण्यासाठी आनंददायी घोषणा असतात, तेव्हा या सर्व बेक्कार कृत्यांसाठी स्पष्टीकरण देणे हे निराशाजनक असते. अशा प्रकारे अस्वस्थता निर्माण करणे हा निव्वळ नीच पणा आहे!" असंही साई पल्लवीनं ट्वीटमध्ये लिहिलं. साई पल्लवीच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Honestly, I don’t care for Rumours but when it involves friends who are family, I have to speak up.
— Sai Pallavi (@Sai_Pallavi92) September 22, 2023
An image from my film’s pooja ceremony was intentionally cropped and circulated with paid bots & disgusting intentions.
When I have pleasant announcements to share on my work…
साई पल्लवीचे चित्रपट
प्रेमम,फिदा या चित्रपटांमध्ये साई पल्लवीनं काम केलं. साईनं तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. साईनं 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कस्तुरी मान' (Mann Kasturi) या तमिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. साई पल्लवीचा विराट पर्वम (Virata Parvam) हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात साईसोबत राणा दग्गुबतीनं देखील प्रमुख भूमिका साकारली. आता साई पल्लवीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sai Pallavi: 'या' कारणामुळे बालपणी खाल्ला होता मार; साई पल्लवीनं सांगितला मजेशीर किस्सा