Ram Charan: राम चरणनं पत्नी आणि मुलीसह पोहोचला मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात; व्हिडीओ व्हायरल
राम चरण हा नुकताच त्याच्या पत्नी आणि मुलीसोबत मुंबईमधील महालक्ष्मी मंदिरात पोहोचला. मंदिरातील राम, उपासना आणि कालिन यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
![Ram Charan: राम चरणनं पत्नी आणि मुलीसह पोहोचला मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात; व्हिडीओ व्हायरल RRR fame ram charan had darshan in mahalaxmi temple mumbai with family video viral Ram Charan: राम चरणनं पत्नी आणि मुलीसह पोहोचला मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात; व्हिडीओ व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/20/fef3f9cf053bd08eaf13a6eb8b7a068d1703074234788259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ram Charan: दाक्षिणात्य चित्रपटात अभिनेता राम चरणचा (Ram Charan) चाहता वर्ग मोठा आहे. राम चरणच्या घरी काही महिन्यापूर्वी गोंडस मुलीचे आगमन झाले. राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी त्यांच्या मुलीते नाव कालिन कार कोनिडेला असं ठेवले आहे. राम चरण हा नुकताच त्याच्या पत्नी आणि मुलीसोबत मुंबईमधील महालक्ष्मी मंदिरात पोहोचला. मंदिरातील राम, उपासना आणि कालिन यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
महालक्ष्मी मंदिरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये राम चरण आणि त्याची पत्नी उपासना हे दोघे देवीचे दर्शन घेताना दिसत आहे. उपासना ही कालिनला जवळ घेऊन उभी देवीची प्रार्थना करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये राम आणि उपासना मंदिराच्या पायऱ्या उतरताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
राम चरण आणि उपासना हे 20 जून 2023 रोजी आई-बाबा झाले. उपासनानं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिच्या लेकीच्या बारशाच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले होते. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं,,"कालिन कार हे नाव ललिता सहस्रनाम स्त्रोतातून घेतलं आहे. आध्यात्मिक जागृती करणारं हे नाव आहे". राम चरणच्या लाडक्या लेकीचं बारसं थाटात पार पडलं.
View this post on Instagram
राम चरणचा आगामी चित्रपट
राम चरणनं 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात कॅमिओ केला होता. आता राम चरण लवकरच 'गेम चेंजर' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची राम चरणचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात तो कियारा आडवाणीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)