Rohit Sharma : रिषभ पंत-धवनसोबत कधीच रूम शेअर करणार नाही; कपिल शर्मा शोमध्ये हिटमॅनकडून खुलासा
The Great Indian Kapil Show : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमाचं नवं पर्व नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या आगामी भागात क्रिकेटर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने हजेरी लावली होती. दरम्यान त्याने आयुष्यातील घडामोडींसह 'वर्ल्ड कप 2023' (World Cup 2023) भारताचा पराभव का झाला यावरदेखील भाष्य केलं.
Rohit Sharma in The Great Indian Kapil Show : विनोदवीर कपिल शर्माचा (Kapil Sharma) 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show) हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या कार्यक्रमाचं प्रसारण सुरू आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा पहिला भाग नुकताच पार पडला. यात 'अॅनिमल' (Animal) स्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor), नीतू कपूर (Nitu Kapoor) आणि रिद्धिमा कपूर यांनी हजेरी लावली होती. आता दुसऱ्या भागात क्रिकेटर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी हजेरी लावली होती. दरम्यान कपिल शर्मा सुनील ग्रोवरसोबत (Sunil Grover) मजा-मस्ती करताना दिसून आला. दरम्यान रोहितने 'वर्ल्ड कप 2023' (World Cup 2023) आणि टीम इंडियाच्या (Team India) ड्रेसिंग रुममधील अनेक गोष्टींचा उलगडा गेला.
World Cup 2023 मधील भारताच्या पराभवाबद्दल रोहित शर्मा काय म्हणाला?
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चं 142 देशांमध्ये प्रसारण होतं. या कार्यक्रमाचा दुसरा भाग खूपच मजेदार ठरला आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये World Cup 2023 मधील भारताच्या पराभवाबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला,"क्रिकेट सामन्याच्या दोन दिवस आधीच अहमदाबादमध्ये पोहोचून आम्ही प्रॅक्टिस केली होती. टीममधील सर्वच खेळाडू चांगले खेळत होते. अंतिम सामन्यादरम्यानही आम्ही चांगली सुरुवात केली. शुभमन गिल (Shubman Gill) लवकर आऊट झाला. त्यानंतर विराट आणि माझ्यात पार्टनरशिप झाली. त्यामुळे आम्ही चांगला स्कोर करू असं मला वाटत होतं. पण ऑस्ट्रेलिया टीम त्यादिवशी आमच्यापेक्षा चांगली खेळली".
Rohit Sharma said, "when we see No.10-11 batting, we say, 'at least make 10 or 20 runs'. Sometimes they reply, 'If you couldn't score any, what do you expect from us? Why do you want us to make runs (laughs)". pic.twitter.com/NvjZ2jq94X
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 7, 2024
रोहित शर्माच्या या वक्तव्यानंतर उपस्थित असलेली अर्चना पूरन सिंह (Archana Puran Singh) म्हणाली,"तुमचा पराभव झाला असला तरी तुम्ही चाहत्यांची मने जिंकली आहेत. आम्हाला तुझा अभिमान वाटतो".
पंत-धवनसोबत कधीच रूम शेअर करणार नाही : रोहित शर्मा
कपिल शर्माने आपल्या कार्यक्रमात रोहित शर्माला विचारलं की असा कोणता खेळाडू आहे ज्याच्यासोबत रूम शेअर करायला तुला कधीच आवडणार नाही. यावर हिटमॅनने दिलेलं उत्तर सध्या चांगलच चर्चेत आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि आणि ऋषभ पंतसोबत (Rishabh Pant) मी कधीच रूम शेअर करणार नाही. हे दोन्ही खेळाडू रूममध्ये खूप घाण करतात".
रोहित-धवनच्या जोडीची कमाल
रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. शिखर धवन आज टीम इंडियाचा भाग नसला तरी रोहित शर्मासोबत त्याची मैत्री आजही टिकून आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
संबंधित बातम्या