'आमच्या संघातील खेळाडू 'सुस्त मुर्गे''; IPL आणि आगामी विश्वचषकादरम्यान रोहित शर्मा काय म्हणाला?
रोहित शर्मा त्याच्या स्फोटक फलंदाजीशिवाय क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या मजेदार शैलीसाठी प्रसिद्ध आहे.
मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) खूप चर्चेत आहे. त्याचे कर्णधारपद सध्या आयपीएलचा चर्चेचा विषय आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने संघातील खेळाडूंबाबत केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सुरु झाली आहे.
रोहित शर्माने श्रेयस अय्यरसोबत प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या शो द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये सहभागी झाला होता. यादरम्यान कपिलने रोहितला स्टंप माईकजवळील संवादाबाबत प्रश्न विचारला. यावर भारतीय संघातील खेळाडू 'सुस्त मुर्गे' (मराठी बोलायचं झाल्यास आळशी कोंबडे) आहेत. त्यामुळे मला बोलावं लागतं, असं उत्तर रोहित शर्माने दिलं. सध्या आयपीएल सुरु आहे आणि आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धाही रंगणार आहे. याचदरम्यान रोहितचं हे विधान व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा त्याच्या स्फोटक फलंदाजीशिवाय क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या मजेदार शैलीसाठी प्रसिद्ध आहे. सामन्यांदरम्यान खेळाडू आणि पंचांसोबतच्या त्याच्या मजेदार गप्पा सोशल मीडियावर व्हायरल होतात. इतकंच नाही तर पत्रकार परिषद आणि मुलाखतींमध्येही त्याचा सेन्स ऑफ ह्युमर पाहायला मिळतो, जो चाहत्यांना खूप आवडतो. त्याची हीच स्टाईल कपिल शर्माच्या शोमध्येही पाहायला मिळाली.
रोहितने भारतीय खेळाडूंना 'सुस्त मुर्गे ' असं का म्हटले?
नेटफ्लिक्सने 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये कपिल रोहितला विचारतो, “आम्ही पाहिले आहे की जेव्हा सामना सुरु असतो, तेव्हा करोडो लोक टीव्हीवर तो पाहत असतात. तु सामना सुरु असताना स्टंपमाईकवर एखादं विधान केलं, ज्यामुळे तुझे सामन्यातील फी कापली आहे का?, यावर रोहित म्हणतो की, आम्ही हिंदीत बोलतो आणि सामन्याचे रेफ्री परदेशी असतात. त्यांना आम्ही काय बोलतो समजत नाही. मात्र माझे काही विधानं तुम्ही ऐकली असतील. काय करु मी हे माझ्या संघातील खेळाडू सुस्ते मुर्गे (मराठी बोलायचं झाल्यास आळशी कोंबडे) आहेत, ते धावतही नाहीत, म्हणून मला तसं बोलावं लागतं, असं रोहित शर्माने सांगितले. रोहित शर्माच्या या विधानानंतर एकच हशा पिकला.
Rohit Sharma coming to Kapil Sharma show this Saturday.
— Selfless⁴⁵ (@SelflessCricket) April 4, 2024
New teaser released by Netflix...! pic.twitter.com/Z8oRz1ZhFf
पूर्ण शो शनिवारी प्रदर्शित होणार-
रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून सामील होणार आहेत. या भागाचा प्रोमो रिलीज झाला आहे, ज्याचा संपूर्ण शो या शनिवारी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.
संबंधित बातम्या:
हार्दिक पांड्यावर चाहत्यांचा रोष का वाढला?; रवी शास्त्रींनी सांगितले यामगील एकमेव कारण!
आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, Photos